SSB Recruitment 2023 : देशसेवेची इच्छा उराशी बाळगून बसलेल्या आणि भारतीय सशस्त्र सीमा दलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सशस्त्र सीमा दलात काही रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.
या भरतीच्या माध्यमातून सशस्त्र सीमा दलातील 1638 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना देखील भारतीय सशस्त्र सीमा दलाने जारी केली आहे. निश्चितच ज्या तरुणांना सशस्त्र सीमा दलात नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी राहणार आहे.
दरम्यान या पदभरतीसाठी इच्छुकांना, पात्र उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आव्हान केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या भरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मुंबई, कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेला सुरु होणार सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस !
कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी होणार भरती?
अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल HC (तंत्रज्ञ)च्या 914, कॉन्स्टेबल ट्रेड्समन – 543, असिस्टंट कमांडंट (पशुवैद्यकीय) – 18 जागा, उपनिरीक्षक SI (तांत्रिक) – 111 जागा, एएसआई (पॅरामेडिकल स्टाफ) – 30 जागा, एएसआई (स्टेनो) – 40 जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता?
वर नमूद केलेल्या पदासाठी पदानुसार दहावी पास, बारावी पास, बारावी सायन्स पास, तसेच संबंधित विषयातील पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मात्र उमेदवारांना एकदा अधिसूचना वाचावी लागणार आहे.
वयोमर्यादा
वर नमूद केलेल्या पदासाठी पदानुसार 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.
निवड कशी होणार?
अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, वर नमूद केलेल्या पदांसाठी लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
हे पण वाचा :- म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय? अर्ज भरतांना अडचण येतेय मग ‘या’ नंबरवर एक कॉल करा, अडचण होणार चुटकीसरशी दूर
अर्ज कसा करावा लागणार?
यासाठी सशस्त्र सीमा दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज विहित कालावधीच्या आत सादर करायचा आहे. ssbrectt.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?
भारतीय सशस्त्र सीमा दलात निघालेल्या या भरतीसाठी 18 जून 2023 पर्यंत इच्छुकांना आपला अर्ज वर दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. विहित कालावधीमध्ये उमेदवारांना आपला अर्ज सादर करायचा आहे. विहित कालावधीनंतर सादर झालेल्या अर्जावर कोणत्याही परिस्थितीत विचार होणार नाही याची नोंद मात्र उमेदवाराने घ्यायची आहे.
जाहिरात कुठं पाहणार?
http://ssbrectt.gov.in/default.aspx या लिंकवर जाऊन इच्छुक व्यक्तींना या भरतीची जाहिरात पाहता येणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाहीर; केव्हापासून धावणार, कुठं राहणार थांबा? वाचा…..