Teacher Recruitment:- विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षण घेऊन देखील आता नोकरीचे प्रमाण अत्यल्प आहेच परंतु आता नोकरीच्या बाबतीत देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नियम किंवा आदेश अमलात आणले जात असल्यामुळे नोकरी मिळवणे अधिकच दुरापास्त होत चालल्याचे सध्याचे चित्र आहे.
बरेच विद्यार्थी अनेक वर्षांपासून परीक्षांची तयारी करतात परंतु आता बरीच पदे हे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असल्यामुळे देखील विद्यार्थ्यांची प्रचंड प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. त्यासोबतच प्राथमिक शिक्षकाकरिता डीएड आणि टीईटी सारखी परीक्षा आवश्यक करण्यात आलेली आहे आणि आता त्यातच बीएड बाबत देखील एक महत्त्वाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. नेमका हा आदेश काय आहे व त्याचा परिणाम कसा होणार आहे? याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत.
बीएडच्या जागी असणार आयटीईपी प्रोग्राम
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता सरकारी शाळांमध्ये शिक्षक व्हायचे असेल तर बीएड अभ्यासक्रमाला आता अभ्यासक्रमाचा दर्जा राहणार नसून त्या अभ्यासक्रमाच्या जागी आता आयटीइपी प्रोग्राम असणार आहे व हा प्रोग्राम नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन च्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे व यालाच आयटीइपी असे नाव देण्यात आले आहे.
हा अभ्यासक्रम चार वर्षाचा असणार असून 2030 नंतर जी काही शिक्षक भरती होईल ते आता आयटीइपी अभ्यासक्रमांतर्गतच केली जाणार आहे. तसे पाहायला गेले तर बीएड हा अभ्यासक्रम देखील सुरूच राहणार आहे.परंतु तो आता केवळ शिक्षणाचा भाग असणार असून त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी करता येणार आहे. म्हणजेच याचाच अर्थ आता येणाऱ्या काही वर्षांमध्ये बीएड महाविद्यालयांमधून आयटीइपी कोर्सचा पर्याय सुरु होणार आहे.
येणाऱ्या कालावधीत आता उच्च शिक्षण ते प्राथमिक शिक्षण या सगळ्या टप्प्यांवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाणार असल्यामुळे आता शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. याच बदलानुसार आता 2030 पासून चार वर्षाचा बीएड किंवा चार वर्षाचा एकात्मिक शिक्षक कार्यक्रम अर्थात आयटीइपी पदवी धारण करणे अनिवार्य केले जाईल अशा प्रकारची तयारी सध्या सुरू आहे.
आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विचार केला तर बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंत शिक्षकांसाठी कमीत कमी पात्रता निश्चित करण्यात आली असून बीए बीएड तसेच बीएससी बीएड आणि बीकॉम बीएड यांचा समावेश असणार आहे. एवढेच नाही तर या शैक्षणिक सत्रापासून 41 विद्यापीठांच्या अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर आता चार वर्षाचा बीएड कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.
पुढील आठवड्यामध्ये त्या राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा करिता नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज विंडो उघडण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या शिफारशीनुसार आता चार वर्षाचा बीएड कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. या प्रवेश परीक्षा करिता उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिला जाणार आहे.
एवढेच नाही तर शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून आयटीईपीच्या चार वर्षाचा एकात्मिक शिक्षण कार्यक्रमाचा पायलट प्रोजेक्टकरिता विद्यापीठांच्या माध्यमातून अर्ज देखील मागवण्यात आले आहे. तसेच यूजीसीच्या माध्यमातून विद्यापीठांमध्ये प्राध्यापक पदांच्या भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता सेंट्रल यूनिवर्सिटी फॅकल्टी रिक्रुटमेंट पोर्टल अर्थात सीयु ही निवड सुरू केली असून आता या पोर्टलच्या मदतीने विद्यापीठांमध्ये प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज करता येणार असून आता ती प्रक्रिया सुरू होणार आहे.