जॉब्स

UPSC Interview Questions : एका माणसाच्या डोक्यावर अंदाजे किती केस असतात?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत (Interview) असे अनेक प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारतातील कोणते राज्य सर्वात शाकाहारी आहे?
उत्तर : राजस्थान

प्रश्न : भारतात सर्वात अगोदर कोणत्या राज्यात प्लास्टिक बंद झाले?
उत्तर : गोवा

प्रश्न : सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी त्यात काय मिसळतात?
उत्तर : तांबा

प्रश्न : कोणत्या देशातील लोक सर्वात श्रीमंत असतात?
उत्तर : अमेरिका

प्रश्न : कोणत्या देशात प्राणी पाळू शकत नाही?
उत्तर : इराण

प्रश्न : कोणत्या पक्षाचे अंडे सर्वात मोठे आहे?
उत्तर : शहामृग

प्रश्न : एका माणसाच्या डोक्यावर अंदाजे किती केस असतात?
उत्तर : १ ते १. ५० लाख

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts