Maharashtra Real Estate : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत सध्या विविध पदांच्या जागा भरल्या जाणार असून, उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “वित्त सल्लागार” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 अशी आहे. देय तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार वाणिज्य शाखेतून पद्युत्तर पदवी मिळवलेले असावेत.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
अर्ज techoff2@maharera.mahaonline.gov.in या ईमेलद्वारे पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://maharera.maharashtra.gov.in/
या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.वेतन
वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 50000/- रुपये इतका पगार मिळेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-उमेदवारांनी techoff2@maharera.mahaonline.gov.in या ई-मेलद्वारे अर्ज सादर करवते.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत. अन्यथा अर्ज अपूर्ण समजून नाकारला जाईल.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.