जॉब्स

YASHADA Pune Bharti : पुण्यात जॉबची मोठी संधी; दरमहा मिळेल ‘इतका’ मिळेल पगार!

YASHADA Pune Bharti 2024 : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.

वरील भरती अंतर्गत “असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, रिअल इस्टेट मॅनेजर” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

असोसिएट प्रोफेसर : मान्यताप्राप्त विद्यापीठातील / प्रशिक्षण संस्थेतील समकक्ष पदावर कार्यरत अधिकारी

असिस्टंट प्रोफेसर : राज्य / केंद्र शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर असलेला सुयोग्य अधिकारी (राज्य शासनाच्या सेवेत किमान ७ वर्षे सेवा)

रिअल इस्टेट मॅनेजर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता या संवर्गातील अधिकारी.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

ई-मेल पत्ता

इच्छुक उमेदवारांनी अर्ज admin@yashada.org या ईमेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.yashada.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20 ते 23 हजार इतका पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

-पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या ई-मेलद्वारेच अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अर्ज सादर करण्यापूर्वी भरती जहिरात सविस्तर वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts