Job In Abroad:- आपल्याला माहित आहे की काही लोकांमध्ये काही विशेष कौशल्य किंवा प्रतिभा असते व अशा प्रतिभावान व्यक्तींना जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी झटक्यात नोकरी मिळू शकते व अशा लोकांसाठी नोकरीच्या संधी देखील मोठे असतात. विशेष म्हणजे जगातील अनेक देशांनी वर्क परमिट बाबतचे जे काही नियम आहेत ते मोठ्या प्रमाणावर शिथिल देखील केले आहेत.
जेणेकरून प्रतिभावान आणि विशेष कौशल्य असलेल्या लोकांना देशात नोकरीच्या संधी सहज मिळू शकतात.जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत जिथे कुशल कामगारांना नोकरी मिळवणे खूप सोपे असते. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर तसेच डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट तसेच इलेक्ट्रिशियन अशी काही पदे आहेत जे एक कौशल्य कामगारांच्या श्रेणीमध्ये ठेवली जातात व अनेक देशांमध्ये या नोकऱ्या करणाऱ्या लोकांसाठी नियम देखील आता खूप सोपे करण्यात आले आहेत.
अगदी याचप्रमाणे तुम्हाला देखील विदेशात काम करायचे असेल आणि तुमच्याकडे खास अशी कौशल्य असतील तर तुम्हाला 2025 मध्ये अनेक देशांमध्ये नोकरी मिळू शकते व या कालावधीत अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या मिळणार आहेत. त्यामुळे या लेखात असे कोणते पाच देश आहेत की जिथे कुशल कामगारांना सहज नोकरी मिळू शकते त्याबद्दल माहिती घेऊ.
या देशांमध्ये मिळू शकेल तुम्हाला पटकन नोकरी
1- ऑस्ट्रेलिया- ऑस्ट्रेलियामध्ये वर्क हॉलिडे व्हिसा दिला जात असून ज्या माध्यमातून कुशल कामगार देशात येऊन काम करू शकतील हे त्यामागील उद्दिष्ट आहे. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिजा खूप चांगला आहे. यामध्ये व्यक्ती काम देखील करू शकतो व ऑस्ट्रेलियात प्रवास देखील करू शकतो.
ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक मागणी ही कृषी आणि पर्यटन क्षेत्रात कौशल्य असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. यासोबतच हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या लोकांची देखील गरज या ठिकाणी भासणार असल्याने 2025 मध्ये या ठिकाणी अशा लोकांना खूप मोठ्या नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहे.
2- कॅनडा- कॅनडा या देशाच्या टेम्पररी फॉरेन वर्कर प्रोग्रामच्या माध्यमातून ग्लोबल टॅलेंट स्ट्रीम देशातील कंपन्यांना जगभरातील सर्वात उत्कृष्ट कौशल्य असणाऱ्या लोकांना कामावर घेण्याचा पर्याय देते. या ठिकाणी विशेष कौशल्य असणाऱ्या कामगारांना दोन आठवड्यात व्हिजा दिला जातो.
कॅनडामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट आणि सायबर सुरक्षा तज्ञांची खूप मोठी गरज असल्यामुळे व त्यासोबतच इंजिनिअरिंग क्षेत्रात सिविल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर्सना देखील मोठी मागणी आहे.
3- न्युझीलँड- सुंदर अशा खोऱ्यांसाठी जगाच्या पाठीवर प्रसिद्ध असलेल्या न्यूझीलंडला देखील आता कौशल्य असणाऱ्या कामगारांची गरज भासणार असून तुमच्याकडे देखील असे काही विशेष कौशल्य असेल तर तुमच्यासाठी या देशात सेटल होण्यासाठी खूप सोपे होणार आहे.
या ठिकाणी अनुभव तसेच पात्रता व वयाच्या आधारावर विसा मिळण्याची शक्यता वाढते. न्युझीलँडमध्ये हेल्थकेअर क्षेत्रात डॉक्टर, नर्सेस तसेच काळजी घेणाऱ्या म्हणजेच केअरटेकर कर्मचाऱ्यांची गरज आहे. या व्यतिरिक्त बांधकाम क्षेत्रात प्रकल्प व्यवस्थापक, गुणवत्ता सर्वेक्षण करणारे आणि सुतारांची देखील या ठिकाणी गरज भासणार आहे.
4- जर्मनी- या देशाचा जॉब सिकर व्हिसा कुशल कामगारांना काम करण्यास आणि सहा महिन्याच्या आत नोकरी शोधण्याची परवानगी देतो. एखाद्याला जर या ठिकाणी नोकरीची ऑफर मिळाल्यास तो वर्क रेसिडन्स परमिटसाठी अर्ज करू शकतो.
जर्मनीला प्रामुख्याने इंजिनिअरिंग क्षेत्रात ऑटोमोटिव्ह, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. त्यासोबतच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि आयटी सल्लागारांची देखील या ठिकाणी मोठी गरज आहे.
5- युएइ अर्थात संयुक्त अरब अमीराती- संयुक्त अरब अमिरातीत एक वर्षाच्या रिमोट वर्किंग परमिटचा पर्याय देत असून ज्या माध्यमातून इतर देशातील कर्मचारी या देशात राहून आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी काम करू शकता.
या परमिटकरिता अर्जदाराला रोजगाराच्या नोंदी दाखवाव्या लागतील आणि वेतन मानक पास करावे लागेल. या ठिकाणी एसइओ विशेषज्ञ, सामग्री निर्माते आणि सोशल मीडिया व्यवस्थापक यांची मोठी मागणी आहे. त्यासोबतच अकाउंटंट आणि फायनान्शिअल अनालिस्ट यांची देखील या ठिकाणी गरज आहे.