कृषी

50 Hajar Protsahan Anudan : 50 हजार प्रोत्साहन अनुदान टांगणीला , शेतकरी आला मेटाकुटीला ; केव्हा निघणार प्रोत्साहन अनुदानाचा मुहूर्त

50 Hajar Protsahan Anudan : गेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली. त्यावेळी गत ठाकरे सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

निर्णय घेतल्यानंतर विविध कारणांमुळे महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. शेवटी महाविकास आघाडी सरकार पडले. राज्यात सत्ता बदल झाला आणि शिंदे आणि भाजप यांनी युवती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. राज्यात शिंदे सरकारचा उदय झाला.

शिंदे सरकारने सत्तेत आल्यानंतर पूर्वीच्या सरकारचे अनेक निर्णय फिरवून लावलेत. मात्र शेतकरी हिताचा 50 हजार प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय अबाधित राखला. शिंदे सरकारने 2017 18, 2018 19 आणि 2019 20 या कालावधीत एक कर्ज घेतलेल्या आणि किमान दोन वर्षाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याच ठरवलं. आता याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

दिवाळी आधी प्रोत्साहन पर अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांची पहिली यादी सार्वजनिक झाली आहे. पहिल्या यादीत नाव आलेल्या पात्र शेतकरी बांधवांना विशिष्ट क्रमांकासह आधार प्रामाणिकरण सक्तीचे करण्यात आले. आधार प्रामाणिकरण झाल्यानंतर संबंधित शेतकरी बांधवांना अनुदानाची रक्कम मिळाली.

तदनंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला प्रोत्साहनपर अनुदानाची ठराविक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दुसरी यादी सार्वजनिक करण्यात आली. मात्र आता पहिली यादी सार्वजनिक होऊन जवळपास दीड महिना उलटला तरीदेखील सर्व जिल्ह्यातील अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाही. यामुळे प्रोत्साहन पर अनुदान टांगणीला लागले असल्याचे चित्र आहे.

शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून अनुदानासाठी पात्र शेतकरी बांधवांना 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याचे प्रशासन नमूद करत आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याने प्रोत्साहन पर अनुदान टांगणीला लागले असल्याचे सांगितले जात आहे.

एकंदरीत निवडणुकाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान शेतकरी बांधवांना खरीप हंगामात अतिशय तुटपुंजी उत्पन्न मिळाले असल्याने शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी भांडवल उभारणी हेतू पैशांची निकड आहे. यामुळे शेतकरी बांधव प्रोत्साहन पर अनुदानाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातही कर्जाची परतफेड करणारे शेतकरी बांधव प्रोत्साहन अनुदानाची वाट पाहत आहेत. आपल्या माहितीसाठी या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की, तालुक्यातील 69805 शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे.

यापैकी दहा हजार 256 शेतकरी बांधवांचा पहिल्या यादीत समावेश होता आणि त्यांना अनुदान मिळाले आहे. आता उर्वरित शेतकरी बांधवांना टप्प्याटप्प्याने प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts