यंदा तुरीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला असून, तुरीचे भाव ९ हजार प्रति क्विटल पर्यंत जाऊन पोहचले आहेत. शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळत असला तरी उत्पादन कमी असल्याने त्याचा किती फायदा शेतकऱ्यांना होईल हे लवकरच कळणार आहे.
यंदा पाऊस लांबल्याने लागवड घटली, तसेच नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाचाही मोठा फटका बसल्याने उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत असून, किडीच्या प्रादुर्भावामुळे तुरीचे उत्पादन कमी झाले आहे. तुरीला समाधानकारक भाव मिळत असला तरी उत्पादनात प्रचंड घट झाली आहे.
खरीप हंगामातील नवीन तुरीची आवक सुरु झाली असली तरी डाळ बाजारात येण्यास १५ जानेवारीपासून सुरुवात होईल जुनी तुरदाळ सध्या १६० रुपये किलोने विकली जात आहे. नवीन तुरदाळ आल्या नंतर भविष्यातील तेजी- मंदी लक्षात येईल