कृषी

कोण म्हणतं शेती तोट्याची? ‘हा’ पट्ठ्या आजही पारंपरिक शेतीतून कमवतोय लाखो रुपये, वाचा ‘या’ अवलियाची यशोगाथा

Successful Farmer: भारतातील शेती (Indian Farming Sector) आता हायटेक बनू पाहात आहे. काळाच्या ओघात भारतीय शेतकरी बांधव (Farmers) आता शेती व्यवसायात (Farming Business) आधुनिक तंत्रज्ञानाचा (New Farming Technology) मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत.

यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) भरीव वाढ देखील होत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना काळाच्या ओघात आधुनिक पद्धतीने शेती (Modern Farming) करण्याचा सल्ला देत आहेत. असे असले तरी झारखंडमधील एक अवलिया शेतकरी आजही पारंपारिक पद्धतीने शेती करीत आहे.

विशेष म्हणजे शेती जरी पारंपारिक पद्धतीने करत असला तरी देखील लाखो रुपयांची कमाई हा अवलिया करत आहे. यामुळे या अवलियाची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली आहे. झारखंड मधील रांची जिल्ह्यातील नगडी येथे राहणारा कुलदीप कोयरी या अवलिया शेतकऱ्याने पारंपारिक पद्धतीने शेती करून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.

कुलदीप खुंटी जिल्ह्यातील जलतांडा येथे शेती करतो. कुलदीप पारंपारिक पद्धतीने शेती करतात मात्र बाजारात ज्‍या पिकांची नेहमी मागणी असते त्याच पिकांची शेती करतात. यामुळे कुलदीप यांना अधिक उत्पन्न मिळत असल्याचे समजते.

कुलदीप सांगतो की, त्यांच्या आजोबांनंतर त्याचे वडील आणि आता तो स्वतः शेती करतो. शेती हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. पूर्वी ते नागरी येथे शेती करायचे. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय शेती करण्यासाठी खुंटी येथे आले. जिथे ते भाडेतत्त्वावर जमीन घेऊन शेती करतात. कुलदीपने सांगितले की, त्याने 15 एकर जमीन लीजवर म्हणजेच भाड्यावर घेतली आहे.

कुलदीप सांगतात की, अगदी लहानपणापासून त्यांना शेतीची मोठी आवड आहे. त्यांच्या शेतात पारंपरिक तंत्राने शेती करताना ते लहानपणापासून पहात आले आहेत अशातच त्यांनी देखील शेती करण्याची कसब आत्मसात केली आहे. आज कुलदीप पारंपारिक पद्धतीचा अवलंब करून शेती करतो. यातून तो चांगला नफा कमावतो, आजही त्याचे वडील त्याला शेतीत मदत करत आहेत. 

भोंडा धरणाच्या पाण्याने सिंचन

कुलदीपने सांगितले की, तो त्याच्या शेतात सिंचनासाठी ठिबक किंवा मल्चिंग पद्धत वापरत नाही कारण त्याने ही जमीन भाडेतत्त्वावर घेतली आहे, त्याच्याकडे बोअरिंगची सोय नाही. त्यांना असे वाटते की जमिनीचे मालक मल्चिंग केली तर त्याला शेती कसण्यास मनाई करतील.

त्यांनी सांगितले की त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे, सर्व लोक एकत्र येऊन शेती करतात. शेतात हिरव्या भाज्यांव्यतिरिक्त स्वीट कॉर्न, वाटाणे, टरबूज यांची लागवड करतात. नगदी पीक विकण्यास कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा अभाव

कुलदीपने सांगितले की, त्याला चांगली आणि आधुनिक पद्धतीने शेती करायची आहे, परंतु त्याला कृषी तंत्रज्ञानाची माहिती नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान नसल्याने कुलदीप आजही पारंपरिक पद्धतीने शेती कसत आहेत. तो शेतात युरिया, डीएपी आणि शेणखत वापरतो.

लॉकडाऊनमध्ये त्यांचे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कोणत्याही शासकीय सुविधांचा लाभ मिळाला नाही. आजही त्यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय सुविधांचा लाभ मिळत नाही.

मात्र, त्याला प्रशिक्षणाची व्यवस्था केल्यास तो उत्तम शेती करू शकतो, असे त्यांनी सांगितले. निश्चितच आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा अभाव असताना देखील लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधून कुलदीप इतर शेतकऱ्यांसाठी एक मोठे प्रेरणास्थान बनले आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts