Successful Farmer: माणसाचे नशीब बदलायला जास्त वेळ लागतं नाही. नशीब राजाला कधी रंक बनवेल अन रंकला कधी राजा बनवेल हे काही सांगता येतं नाही.
मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातही एका अवलियाबाबत असच काहीसं घडलं आहे. उस्मानाबाद (Osmanabad) मधील राजशेखर पाटील या अवलियाच्या आयुष्यात लक फॅक्टर मोठा वरचढ ठरला आहे.
खरं पाहता राजशेखर यांचे वडील मुरलीधर पाटील हे सधन शेतकरी (Farmer) कुटुंबातील होते. त्यांचे 70 लोकांचे कुटुंब होते आणि त्यांच्याकडे तब्बल 300 एकर शेतजमीन (Farmland) होती. म्हणजेच राजशेखर पाटील श्रीमंत घराण्यातील होते.
राजशेखर पाटील यांचे वडील मुरलीधर पाटील यांनी हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठातून गणितात एमएससी केले होते. उच्चशिक्षित असून देखील त्यांना आपल्या संस्कृतीचं भान होत म्हणूनच की काय त्यांनी आपल्या सामूहिक कुटुंबासोबत राहण्यासाठी त्याकाळी कोणतीही नोकरी केली नाही.
खरं पाहता त्यावेळी त्यांना निश्चितचं त्यांच्या कॉलिफिकेशनच्या जोरावर चांगली नोकरी मिळाली असती. राजशेखरच्या वडिलांना 13 भाऊ आणि 3 बहिणी होत्या अन ते 70 लोकांच्या कुटुंबासह एकत्रित कुटुंब व्यवस्था चालवत होते. मुरलीधर पाटील यांनी 20 विहिरी बांधल्या आणि 50 कूपनलिका बसवल्या होत्या.
राजशेखर पाटील मौजे निपाणी येथील रहिवाशी आहेत. खरं पाहता (Marathwada) मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग आहे. निपाणी देखील नेहमीच दुष्काळग्रस्त भाग (Drought-prone areas) म्हणून चर्चेत राहात असतो.
राजशेखर यांनी बीएससी-एजीचा अभ्यास केला आणि दीर्घकाळ स्पर्धा परीक्षांची तयारी केली. तरीही सरकारी नोकरी मिळवण्यात त्यांना यश मिळाले नाही. एवढेच नाही तर त्यांना कोणत्याचं कंपनीत खाजगी नोकरी देखील मिळवता आली नाही.
एवढेच नाही तर त्यांना शेतीची (Farming) आवड नसल्याने त्यांनी शेतीपासून देखील चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतला. शेवटी निराशेच्या भरात राजशेखर समाज सुधारक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याकडे गेले अन त्यांच्यासोबत काम करू लागले.
राजशेखर पाटील यांनी अण्णा हजारेंसोबत जलसंधारण, मृदसंधारण आणि व्यसनमुक्ती यांसारख्या मोहिमांमध्ये काम केले. अण्णा हजारे त्यांना सुरुवातीला महिन्याला 2000 रुपये द्यायचे आणि 6 वर्षे काम केल्यानंतर त्यांचा पगार 6000 रुपये महिना अण्णांनी केला होता.
कुटुंबावर 15 लाखांचे कर्ज अन वडीलही आजारी
एकेकाळी सामूहिक कुटुंबासाठी नोकरी न स्वीकारणाऱ्या व सामूहिक परिवाराला वाचवणाऱ्या मुरलीधर पाटील यांच्या डोळ्यांसमोर कुटुंबाची अखेर वाटणी झाली.
यानंतर अचानक राजशेखर यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. शेवटी राजशेखर यांच्या आईने त्यांना फोन केला घरची सर्व परिस्थिती सांगितली. राजशेखर यांच्या आईने राजशेखर यांना घरावर 15 लाखांचे कर्ज असल्याचे सांगितले आणि घरी बोलवले.
त्यांच्या आईच्या मते राजशेखर अण्णा हजारे यांच्यात सामील झाल्याने त्याचे लग्नही होत नाही. म्हणुन त्यांच्या आईने त्यांना शेती करण्याचा सल्ला दिला.
यानंतर राजशेखर पाटील घरी परतले आणि त्यांनी ऊस, पपई, भाजीपाल्याची लागवड सुरू केली. सुमारे 5 वर्षे त्यांनी ही शेती केली. राजशेखर पाटील यांच्या गावात पाण्याची मोठी समस्या असून त्यांना मजूरही मिळाले नाहीत.
शेताला कुंपण घालायला पैसे नव्हते म्हणून बांबू लावला
यादरम्यान, त्यांनी जलपुरुष राजेंद्र सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना 13 गावांमधील 35 किमी लांबीच्या नाल्याचे खोदकाम करणार्या टीमचे प्रमुख बनवले.
राजशेखर यांनी लोकांकडून पैसे गोळा करून 35 किमी लांबीचा नाला साफ करून त्याचे खोलीकरण केले. त्याला शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. अचानक सरकारी रोपवाटिकेत बांबूची रोपे मोफत दिली जात असल्याचे त्यांना समजले.
आपल्या पिकाचे रक्षण करण्यासाठी त्याला शेताला कुंपण घालायचे होते पण त्यासाठी पैसे नव्हते. राजशेखरने विचार केला की आपण शेताच्या आसपास बांबू लावू. जेणेकरून कुंपण तयार होईल. मग काय त्यांनी कुंपण म्हणून बांबू लावण्याचा निर्णय घेतला.
कुंपणासाठी लावलेल्या बांबूने त्याला दोन वर्षात करोडपती बनवले
राजशेखर पाटील यांनी बांबूची 40 हजार रोपे आणून शेताच्या बांधावर लावली. 2 वर्षात त्यापासून 10 लाख बांबू तयार करण्यात आले. ते राजशेखरने 20, 50 आणि 100 रुपयांना विकले होते. अशा प्रकारे त्यांची उलाढाल अवघ्या 2 वर्षात एक कोटी रुपयांवर पोहोचली. यानंतर त्यांनी आणखी बांबू आणून त्यांच्या संपूर्ण शेतात लावले.
आज त्यांच्याकडे दरवर्षी 1 कोटी बांबू तयार आहेत. त्यांची उलाढाल सुमारे 6-7 कोटी रुपये आहे. बांबूने राजशेखर पाटील यांचे नशीब बदलले आहे. यानंतर राजशेखर पाटील यांनी भारतभरातून मिळणाऱ्या सर्व उत्तमोत्तम बांबूच्या जाती आणून आपल्या शेतात लावल्या. काही जमीनही विकत घेतली.
त्यांची जमीन आता जवळपास 54 एकर झाली आहे. राजशेखर पाटील यांनी बांबू रोपवाटिकाही स्थापन केली आहे. जिथे दरवर्षी 20 लाख बांबू रोपे तयार केली जातात. जे शेतकऱ्यांना 20, 50 आणि 100 रुपयांना विविधतेनुसार विकले जातात. राजशेखर रोजाना शंभरहून अधिक लोकांना बांबू शेती विषयी अवगत करत आहे.
याशिवाय राजशेखर आपल्या शेतात 100 हून अधिक लोकांना रोजगार देखील पुरवत आहेत. निश्चितच राजशेखर यांनी शेतीमध्ये केलेला हा बदल इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा सिद्ध होऊ शकतो.