कृषी

Agri Business Idea : कमी वेळेत भरपूर नफा कमवायचा आहे! तर शेती करत असताना करा हे व्यवसाय,मिळेल पैसा

Agri Business Idea :- शेती करत असताना शेती सोबत अनेक प्रकारचे व्यवसाय करता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करत असताना अशा व्यवसायांची जोड शेतीला देणे खूप गरजेचे आहे व ती काळाची गरज आहे. सहजपणे शेती करत असताना करता येणारे असे अनेक व्यवसाय आहेत की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे व भांडवल देखील कमीत कमी लागते.

तसे पाहायला गेले तर यामध्ये शेतीशी निगडित असलेले  व चांगला आर्थिक फायदा मिळवून देणारे व्यवसाय आहेत फक्त त्यांची योग्य निवड करणे तितकेच गरजेचे आहे. याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये काही शेतीशी संबंधित असलेल्या व्यवसायांची माहिती घेऊ. जेणेकरून कमीत कमी भांडवलामध्ये

आणि कमी वेळेत चांगला नफा तुम्ही मिळवू शकाल.

 हे व्यवसाय देतील शेती करत असताना चांगला पैसा

1- सेंद्रिय खतांचा व्यवसाय सेंद्रिय खत तयार करण्याचा व्यवसाय देखील एक खूप फायदेशीर व्यवसाय असून कोणतेही शेतकरी अगदी सहजपणे या व्यवसायाची सुरुवात करू शकतात. कारण कोणत्याही वनस्पतीच्या चांगल्या वाढीसाठी कंपोस्ट किंवा सेंद्रिय खताची आवश्यकता आहे.

त्यामुळे सेंद्रिय खत उत्पादन व्यवसाय अलीकडील काळामध्ये एक चांगला विकसित होणारा व्यवसाय आहे. याकरिता तुम्ही मार्केटचे संशोधन करणे गरजेचे असून उत्तम मार्केटिंग केली तर सेंद्रिय खत विक्रीसाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही. कारण आता दिवसेंदिवस सेंद्रिय शेतीकडे आणि त्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादन वापरावर जास्त भर देण्यात येत असल्यामुळे या व्यवसायाला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत.

2- फळांचे रस उत्पादनाचा व्यवसाय आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कोणत्याही फळाचा रस पिणे हे आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असून अनेक डॉक्टर देखील वेगवेगळ्या फळांचा रस पिण्याचा सल्ला देतात. कारण फळांच्या रसाच्या माध्यमातून आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले अनेक पोषक घटक मिळत असल्याने या रसांची खूप मागणी असते.

त्यामुळे तुम्ही जर कमीत कमी गुंतवणुकीत चांगला नफा देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असेल तर  तुम्ही हा व्यवसाय तुमच्या गावातून किंवा जवळच्या एखाद्या गर्दीच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुरू करू शकतात. ज्या पद्धतीने मागणी वाढत जाईल तशा पद्धतीने तुम्ही रस तयार करून विकू शकतात. तसेच तयार रस उत्तम पद्धतीने पॅकिंग करून देखील तुम्ही विक्री करू शकतात.

3- मसाल्यांचा व्यवसाय प्रत्येकाच्या घरामध्ये स्वादिष्ट जेवण बनवण्याकरिता मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि हा एक दैनंदिन वापरातील पदार्थ असल्यामुळे याला बाजारपेठेत कायमच मागणी असते. त्यामुळे तुम्ही शेती करत असताना अगदी छोट्या स्तरावर देखील हा व्यवसाय सुरू करून चांगला नफा कमवू शकतात.

त्यानंतर जसजशी तुमची विक्री वाढेल त्या पद्धतीने तुम्ही व्यवसायाचा विस्तार करू शकतात. यामध्ये तुम्ही तयार मसाले उत्तम पद्धतीने पॅकिंग करून देखील दूरवरच्या बाजारपेठेमध्ये पोहोचवू शकता. त्यामुळे कमीत कमी भांडवलात चांगला आर्थिक नफा देणारा हा व्यवसाय आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts