कृषी

Agriculture News : खुशखबर! पोखरा योजनेसाठी अतिरिक्त 200 कोटींच अनुदान, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, शासन निर्णय झाला जारी, खरी माहिती वाचा

Agriculture News : पोखरा (POCRA) म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेबाबत (Yojana) एक अतिशय महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. मित्रांनो पोखरा योजनेत (Farmer Scheme) अनुदानासाठी (Subsidy) अर्ज केलेल्या तसेच पात्र झालेल्या मात्र अद्याप अनुदान न मिळालेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी (Farmer) ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे. पोखरा योजनेसाठी अर्ज केलेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी 4 ऑक्टोबर रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जारी झाला आहे.

मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील 932 गावे अशा एकूण 5142 गावांमध्ये 6 वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4 हजार रुपये कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

तसेच दिनांक 17 फेब्रुवारी, 2022 च्या शासन निर्णयान्वये नाशिक जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा म्हणजे जवळपास 62 गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता सन 2022-23 मध्ये एकूण रु.421.86 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्यापैकी रु.407.56 कोटी एवढा निधी खर्ची पडलेला आहे.

अशा परिस्थितीत उर्वरित निधी वाटप केला जाईल की यामध्ये वाढ केली जाईल हा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा झाला होता. मात्र आता पोखरां प्रकल्पांतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना, शेतकरी गट / कंपन्यांनी व ग्राम कृषि संजीवनी समितीने केलेल्या कामापोटी द्यावयाच्या अर्थसहाय्यासाठी बाहय हिस्सा व राज्य हिस्सा असा एकूण रु.200 कोटी रुपयांचा निधी वितरणासाठी उपलब्ध झाला आहे.

सदर निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्याबाबत आता 4 ऑक्टोबर रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी झाला आहे. निश्चितच आता अतिरिक्त 200 कोटी रुपये पोखरा योजनेसाठी मिळणार असल्याने शेतकरी बांधवांनी पोखरा योजनेसाठी अर्ज केला आहे तसेच ज्यांचा अर्ज स्वीकृत झाला आहे नव्याने अर्ज करणाऱ्या शेतकरी बांधवांना आता या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे. या शासन निर्णयामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. 

शासन निर्णय

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts