कृषी

खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% अनुदानावर शेतजमीन मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Agriculture News : भारत हा शेतीप्रधान देश आहे. यामुळे देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच भूमिहीन शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अशीच एक कल्याणकारी योजना राबवली जाते ज्याच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन शेतमजुरांना शेतजमीन अनुदानावर उपलब्ध करून दिली जाते.

या योजनेचे नाव आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील भूमिहीन शेतमजुरांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेतजमीन शंभर टक्के अनुदानावर वितरित केली जात असते.

यामध्ये 50% अनुदान दिले जाते तसेच 50% कर्ज संबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध होते. या योजने संदर्भात आता गोंदिया जिल्ह्यातून एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील किन्ही व डांगली भागातील तसेच लगतच्या भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील भूमिहीन शेतमजुरांना शेत जमीन मिळवण्यासाठी अर्ज मागविले जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यासाठी अर्ज करणे हेतू इच्छुकांना सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज घेऊन सादर करण्यास आवाहन केले जात आहे. सदर विहित नमुन्यातील अर्ज व्यवस्थितरित्या भरून  अर्जसोबत भूमिहीन असल्याचा दाखला, जन्माचा दाखला जातीचे प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, आधार संलग्नित बँक खाते क्रमांक ( पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत ) इत्यादी आवश्यक दाखले/कागदपत्रांसह ३१ डिसेंबरपर्यंत साहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे सादर करण्यासाठी सांगितले गेले आहे.

इच्छुक अर्जदार व्यक्तींनी काही अडचण उद्भवल्यास किंवा या योजनेबाबत अधिक माहिती आवश्यक असल्यास संबंधित विभागात चौकशी करू शकतात. तसेच या योजनेबाबत आणि अर्ज भरताना मदत लागल्यास संबंधित गावातील तलाठी तसेच ग्रामसेवक यांच्याशी देखील इच्छुक अर्जदार संपर्क साधू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts