Agriculture News : भारतात शेती व्यवसायात (farming) गेल्या काही वर्षांपासून अमुलाग्र बदल झाला आहे. एकेकाळी बैलांच्या साहाय्याने नांगरणी करणारा बळीराजा (farmer) आजच्या घडीला यंत्राच्या साह्याने शेतीची (agriculture) मशागत करत असताना वावरात बघायला मिळत आहे.
यांत्रिकीकरणाच्या युगात शेतकरी बांधवांना शेती कसणे अधिक सोपे झाले आहे. आता शेतीमध्ये ट्रॅक्टरचा (tractor) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करण्यापासून ते काढणीपर्यंत (harvesting) सर्व कामे सहजतेने केली जाऊ लागली आहेत.
यामुळे मजुरांसाठी होणारी धावपळ, लागणारा अतिरिक्त वेळ, या सर्व गोष्टींची बचत झाली आहे. शेतीची कामे अगदी वेळेवर होत असल्याने शेतकरी बांधव देखील आता ट्रॅक्टरच्या साह्याने सर्व कामे करण्यास पसंती दर्शवत आहेत. विशेष म्हणजे वेळेवर शेतीची कामे झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात देखील वाढ होते शिवाय उत्पन्नदेखील अधिक मिळते.
मित्रांनो अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी स्वराज्य कंपनीच्या एका भन्नाट ट्रॅक्टरची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊ या स्वराज कंपनीच्या या ट्रॅक्टरची विशेषता आणि त्याची किंमत. मित्रांनो आज आपण स्वराज 742 एफई या ट्रॅक्टर विषयी जाणून घेणार आहोत.
स्वराज 742 FE ट्रॅक्टर हे स्वराज ट्रॅक्टर ब्रँडचे फ्लॅगशिप मॉडेल आहे, जे ग्राहकांच्या मागणी आणि गरजा लक्षात घेऊन कंपनीने तयार केले आहे. स्वराज 742 FE हे भारतीय शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर त्याच्या वर्गातील सर्वाधिक टॉर्क पॉवरसह येतो.
हा ट्रॅक्टर मल्टी स्पीड रिव्हर्स आणि फॉरवर्ड पीटीओ, पॉवर स्टीयरिंग, सिंगल आणि ड्युअल क्लच आणि उत्तम ब्रेकिंग कार्यक्षमता यासारख्या प्रगत नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. हा ट्रॅक्टर रोटाव्हेटर आणि कल्टिव्हेटर यांसारखी उपकरणे आणि शेतमाल ओढण्यासाठी आणि इतर शेतीच्या कामांसाठी योग्य आहे.
स्वराजच्या या मॉडेलच्या लूकबद्दल सांगायचे तर ते अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. त्याच्या अग्रभागी स्वराज ब्रँडिंग देण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये 3 पॉइंट सेन्सिंग पोर्ट देण्यात आला आहे. या ट्रॅक्टरची उचलण्याची क्षमता 1700 किलोपर्यंत आहे. ट्रॅक्टरच्या बाजूला 12-व्होल्टची बॅटरी देण्यात आली आहे.
तसेच, या ट्रॅक्टरमध्ये समायोज्य प्रकारचा हिच आहे, जी तुम्ही सहजपणे वर आणि खाली समायोजित करू शकता. या ट्रॅक्टरला सिंगल पीस बोनेट देण्यात आला आहे, जो मागील बाजूस उघडतो. स्वराज 742 FE ट्रॅक्टर हे एक अद्वितीय मॉडेल आहे जे उत्कृष्ट कामगिरी आणि शक्तीमुळे भारतीय शेतकऱ्यांच्या मागणीची पूर्तता करत आहे. मशागतीसह जड कामातही कार्यक्षम मायलेजसह उत्कृष्ट कामगिरी प्रदान करत आहे.
स्वराज 742 FE ट्रॅक्टरची किंमत तर जाणून घ्या
स्वराज 742 FE ट्रॅक्टरची किंमत 6.35 – 6.60 लाख आहे. ही किंमत एक्स शोरूम किंमत आहे. स्वराज 742 FE ट्रॅक्टर मॉडेलची किंमत तुमच्या राज्य किंवा शहरानुसार बदलू शकते.