कृषी

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! जागतिक बाजारातून आलेत सोयाबीन दरवाढीचे संकेत ; ‘इतके’ दर वाढणार

Agriculture News : जागतिक बाजारातून शेतकऱ्यांसाठी आज गुड न्यूज आली आहे. ती गुड न्यूज अशी की जागतिक बाजारात सोयापेंड आणि सोयाबीन दरात वाढ झाली आहे. एवढेच नाही तर सोयातेलाचे दर पण आज सुधारलेत. या परिस्थितीचा तुर्तास देशांतर्गत बाजारात कोणताच परिणाम जाणवला नाही.

मात्र आगामी काळात सोयाबीन दरासाठी ही परिस्थिती पूरक ठरणार असल्याचे काही जाणकारांनी सांगितले आहे. एकीकडे जागतिक बाजारात सोयाबीन वधारले मात्र देशांतर्गत बाजार भाव जैसे थे होते. यामुळे शेतकरी बांधव संभ्रमात सापडत आहे. खरं पाहता सध्या जागतिक बाजारात सोयाबीन दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे.

काल गेल्या आठवड्याभरातील उच्चांकि दर नमूद झाला होता मात्र त्यामध्ये घसरण झाली होती. आज पुन्हा दर तेजीत आलेत. विशेष म्हणजे आज जागतिक बाजारात सोयापेंड गेल्या चार महिन्यातील उच्चांकी दरावर पोहचले आहे. सध्या सोयाबीन आणि सोयापेंड तेजीत आले आहे. मात्र आज सोयातेलचे दर वाढून देखील दबावातच आहे.

सोयापेंड, सोयाबीन जागतिक बाजारात चढ्या दरात विक्री होत असल्याने देशाअंतर्गत बाजारात देखील बाजारभावात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र आज देशांतर्गत दर स्थिर पाहायला मिळालेत. आज देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार २५० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते.

महाराष्ट्रात सरासरी ५ हजार २५० ते ५ हजार ५५० रुपयांच्या दरम्यान दर होते. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर सरासरी ५ हजार ६०० ते ५ हजार ७५० रुपयांपर्यंत होते. दरम्यान जाणकार लोकांनी जागतिक बाजारपेठेत सोयाबीन दर सुधारण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे भाकीत वर्तवले आहे. याचा लाभ देशांतर्गत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून देशात सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts