कृषी

Agriculture News : कौतुकास्पद! आता शेतजमिनीवरून होणारा वाद कायमचा मिटणार! ड्रोनद्वारे शेतजमीन मोजणीचा फायदा होणारं

Agriculture News : मित्रांनो आपल्या राज्यात नेहमीच शेतजमिनीवरून भांडणाच्या चर्चा रंगलेल्या असतात. अनेकदा शेतजमिनीचा (Farmland) विवाद हा कोर्टापर्यंत येऊन ठेपतो. यामुळे शेजारी शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये (Farmer) तेढ निर्माण होते.

अनेकदा शेतजमिनीच्या वादावरून हाणामारीच्या घटना देखील आपल्या नजरेस आल्या असतील. आता मात्र शेतजमिनीवरून होणारे वाद कायमचे मिटणार असल्याचे चित्र आहे. यासाठी आता तंत्रज्ञानाचा (Farming Technolgy) वापर होणार आहे.

मित्रांनो शेतजमीन मोजणी वरून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच गावांमध्ये भांडणं होत असतात. मात्र आता शेतजमीन मोजणीसाठी ड्रोनचा वापर केला जाऊ लागला आहे. यामुळे आता शेत जमीन मोजणी वरून होणारे वाद कायमचे निकाली लागणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आपापसात होणारे वाद दूर होतील आणि जमीन मोजणी वरून होणारे भांडण कायमचे सुटणार आहेत.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथील बोरी बुद्रुक गावाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या गावाने चक्क ड्रोनद्वारे (Drone) शेतीजमिनीची मोजणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या सरहद्दी ड्रोनच्या (Farming Drone) साह्याने कायम झाल्या आहेत.

यामुळे गावातील शेजारी-शेजारी असलेल्या शेतकऱ्यांमध्ये जमीनीवरून होणारे वाद कायमचे निकाली काढले गेले आहेत. यामुळे बोरी बुद्रुक गावाने केलेल्या हा ऐतिहासिक निर्णय सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत आमदार अतुल बेनके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार अतुल बेनके यांच्या मते, बोरी बुद्रुक गावाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून यामुळे जमिनीवरून होणारे वाद कायमचे मिटणार आहेत. शिवाय बोरी पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजणार असून या पॅटर्नच्या मदतीने आपापसातील होणारे जमिनीचे वाद तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निकाली निघणार आहेत.

मित्रांनो खरं पाहता जमिनीवरून होणारे वाद कोर्टकचेरी पर्यंत जाऊन पोहोचतात. या वादावरून चालणारे खटले देखील दीर्घकालीन चालतात. यामुळे शेतकरी बांधवांना आपली हातातली कामे सोडून कोर्टकचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात.

अशा परिस्थितीत आळेफाटा येथील बोरी बुद्रुक गावाने घेतलेला हा निर्णय इतरांसाठी देखील आदर्शवत ठरणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बोरी बुद्रुक गावातील जमिनीवरून होणारे वाद कायमचे निकाली काढावे या अनुषंगाने जुन्नर येथील बोरी बुद्रुक येथे शेतजमीन मोजणी समितीने 2017 मध्ये शेतजमिनीचा एक मोजणी आराखडा तयार केला होता.

स्मार्ट विलेज प्रकल्प अंतर्गत हा आराखडा तयार करण्यात आला होता. आता ड्रोनच्या माध्यमातून जमीन मोजणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. निश्चितच बोरी बुद्रुक गावात सुरू झालेला हा अभिनव उपक्रम भविष्यात इतरही गावात बघायला मिळणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts