Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक बळ देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत.
काही योजनांच्या (Yojana) माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक अनुदान (Subsidy) दिले जाते, तर काही योजनांच्या माध्यमातून शेतकर्यांना त्यांच्या शेतीच्या गरजांसाठी कर्जाची (Agriculture Loan) सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
केवळ शासनच नाही तर देशातील अग्रगण्य बँकां देखील शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी तसेच त्यांना शेती करताना कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये यासाठी वेगवेगळ्या योजना चालवत आहेत. आता एका भारतीय बँकेने शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले आहे.
पीएनबी किसान योजनेंतर्गत (PNB Kisan Yojana) पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) शेतकऱ्यांना त्वरित कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजा वेळेवर पूर्ण करता येतील.
खात्यात 50,000 रुपये ट्रान्सफर होतील
शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये आता पंजाब नॅशनल बँकही आपल्या शेतकरी ग्राहकांना त्वरित कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहे. पंजाब नॅशनल बँक तत्काळ कर्ज योजनेंतर्गत, गरजू शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये 50,000 रुपये जमा केले जातील, ज्यासाठी विद्यमान मर्यादा 25 टक्के निश्चित करण्यात आली आहे. या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना कोणतीही सुरक्षा द्यावी लागणार नाही, तर अवघ्या काही कागदपत्रांच्या आधारे शेतकर्यांना 50 हजारांचे कर्ज मंजूर केले जाईल.
सोशल मीडियावरून माहिती
पंजाब नॅशनल बँकेने स्वतः पीएनबी किसान तत्काळ कर्ज सुविधेबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, शेतीची गरज असो किंवा शेतकऱ्यांची घरगुती गरज असो, किसान तत्काळ कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.
असा फायदा घ्या
PNB किसान तत्काळ कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा शेतकरी असणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्याची स्वत:ची शेतीयोग्य जमीन असो किंवा जमीन भाडेतत्त्वावर घेऊन शेती करणार शेतकरी असो दोघांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या नियमांनुसार, शेतकरी किंवा शेतकरी गटातील शेतकऱ्यासाठी किसान क्रेडिट कार्ड असणे देखील अनिवार्य आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे आधीच KCC आहे आणि त्यांचा मागील दोन वर्षांचा बॅंक रेकॉर्ड चांगला आहे, त्यांना त्वरित कर्ज दिले जाईल.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सध्याच्या मर्यादेतून 25 टक्के कर्जाची सुविधा दिली जाणार आहे. या शेतकरी कर्जाची कमाल मर्यादा 50,000 रुपये असेल.
तत्काळ कर्ज योजनेच्या नियमांनुसार, जर कोणत्याही शेतकऱ्याने पीएनबी किसान योजनेचा लाभ घेतला तर त्याला कर्ज भरण्यासाठी 5 वर्षांची मुदत दिली जाईल.
याप्रमाणे अर्ज करा
पंजाब नॅशनल बँक तत्काळ कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही सेवा सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना हवे असल्यास ते या कर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या जवळच्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेशी संपर्क साधू शकतात. या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या pnbindia.in या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.