Agriculture News : यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा घातक सिद्ध झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना खरीपातून अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळणार आहे.
जाणकार लोकांच्या मते, अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील नुकसान झाले असले तरी देखील यामुळे रब्बी हंगामात पावसाची कमतरता भासणार नाही आणि रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्र देखील वाढणार आहे.
दरम्यान रब्बी हंगामात पिकपेरणीसाठी शेतकऱ्यांकडे भांडवल उपलब्ध नसल्याचे चित्र आहे यामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून मोठ्या प्रमाणात पीक कर्ज घ्यावे लागणार आहे. मित्रांनो अतिवृष्टीचे झळ पुणे जिल्ह्याला देखील बसली असून पुणे जिल्ह्यातही परतीचा पाऊस चांगला बरसला आहे यामुळे पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. दरम्यान आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.
पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पुणे जिल्हा बँकेकडून मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 598 कोटी 35 लाख रुपये एवढ्या कर्जाची रक्कम पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी जिल्हा बँकेकडून दिली जाणार आहे. म्हणजेच जिल्हा बँकेने 598 कोटी 35 लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट रब्बी हंगामासाठी ठेवले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या वर्षी 580 कोटी सहा लाख रुपये एवढं रब्बी हंगामासाठी पीक कर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
तर यावर्षी यामध्ये तब्बल 18 कोटींची वाढ बँकेकडून करण्यात आली आहे. जिल्हा बँकेतील शेतकरी बांधवांसाठी जिल्हा बँकेकडून कर्ज वितरणाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. मित्रांनो बँकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी बँकेकडून पीक कर्जासाठी 594 कोटी पाच लाख रुपयांचे उद्दिष्ट घालून देण्यात आले असून दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय यांसारख्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी चार कोटी तीस लाख रुपये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
सध्या पुणे जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याज दराने दिले जात आहे. विशेष म्हणजे रब्बी पिकांव्यतिरिक्त बँक ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांसाठी पुणे जिल्हा बँक पीक कर्ज शेतकरी बांधवांना वितरित करणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच पुणे जिल्हा बँकेने यावर्षी रब्बी हंगामासाठी पिक कर्जाचे उद्दिष्ट वाढवले असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.