Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार ‘या’ दिवशी सुरू होणार ; पशुपालक, व्यापाऱ्यांना दिलासा

Ahmednagar Breaking : आज अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याच्या घोडेगाव आणि कोपरगाव येथील जनावरांच्या बाजाराबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. खरं पाहता नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा बाजार अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा बाजार आहे.

मात्र लंपी आजाराचा प्रादुर्भाव पाहता हा बाजार गेल्या पंधरा आठवड्यांपासून बंद आहे. मात्र आता परिसरातील पशुपालकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. खरं पाहता उद्यापासून हा बाजार खुला होणार आहे. या बाजारात केवळ अहमदनगर जिल्ह्यातून नव्हे तर परराज्यातून व्यापारी आणि पशुपालक जनावरे खरेदी-विक्री करण्यासाठी येत असतात.

यामुळे हा बाजार बंद असल्याने परिसरातील लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपला होता. या बाजाराच्या आवारात असलेले उद्योगधंदे बाजार बंद असल्याने ठप्प होते. विशेष म्हणजे लंपी आजार राज्यात कंट्रोल मध्ये आल्यानंतर तसेच 100% लसीकरण झाल्यानंतर देखील जनावरांचा बाजार सुरू करण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने स्थानिकांकडून तसेच पशुपालक आणि व्यापाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

विशेष म्हणजे बाजार बंद होता मात्र व्यापारी तसेच दलाल लोक चोरून जनावरांचा व्यवहार करत होते. यामुळे बाजार सुरू करण्याची मागणी वाढली. स्थानिकांनी, शेतकऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी मंत्री गडाख यांच्याकडे बाजार सुरू करण्यासाठी मागणी केली होती.

अखेर शेतकऱ्यांच्या तसेच व्यापाऱ्यांच्या मागणीला यश आले असून मंत्रिमहोदयाच्या आदेशाने बाजार समिती प्रशासनाने उद्यापासून हा बाजार सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक केली आहे. याशिवाय कोपरगाव येथील जनावरांचा बाजार देखील 26 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. यामुळे कोपरगाव व आजूबाजूच्या परिसरातील पशुपालकांना तसेच व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

हा देखील बाजार गेल्या चार महिन्यापासून बंद होता मात्र आता सव्वीस तारखेपासून कोपरगावचा बाजार सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे झळकत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts