कृषी

अहमदनगर बाजारभाव : भाजीपाल्याची आवक घटली,भाज्यांचे दर वाढले

Ahmednagar market prices : यंदा पावसाचे प्रमाण सरसरीच्या तुलनेत कमी झाले. त्यामुळे अनेक भागात सध्या पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणारा भाजीपाला कमी येत आहे. अनेकजण चांगला दर मिळत असल्याने आपला माल थेट दुसऱ्या जिल्ह्यात पाठवतात त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटत असून मागणी वाढल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत.

भाजीपाल्यासोबतच कडधान्यांचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत असून, त्यातच परत किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खूपच कमी झाले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा घटला आहे. रोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेल्या कडधान्यांसह भाजीपाला व डाळींचे भाव कडाडले आहेत.

महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्ये घेतली जातात. तसेच राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांतूनदेखील डाळींचा पुरवठा होतो. मात्र यंदा परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला.

हातातोंडाशी आलेले कडधान्याचे पीक आडवे झाले. पावसाने नवीन भाज्यांची लागवड अत्यंत कमी प्रमाणात झाली. परत सध्या पाणी टंचाईचे संकट लक्षात घेता अनेकांनी भाज्यांची लागवड करणे टाळले. त्यामुळे भाज्यांचे दर वधारले आहेत.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो ८००- ३५००, वांगी १५०० – ८०००, फ्लावर १२०० – ५०००, कोबी ३०० १५००, काकडी ६०० – ६०००, गवार ५०००- १३०००, घोसाळे १००० – ४०००, दोडका १००० ४०००, कारले १५००-६०००, भेंडी २००० – ७०००, वाल ३००० ६०००, घेवडा ३५००-५५००, तोंडुळे २००० ४२००, डिंगरी ३००० ५५००, बटाटे ६०० १६००, लसूण ९००० २३०००,

हिरवी मिरची २५०० ५०००, आवळा ३०००- ४०००, शेवगा २२०० ७०००, लिंबू ६०० १८००, आद्रक ३५०० – ७५००, दु.भोपळा ६०० – २५००, शिमला मिरची २५०० ४५००, मेथी ३२०० – ६४००, कोथिंबीर १२०० ४८००, पालक १२०० ४५००, शेपू ३६०० – ३९००, चवळी ३००० ४५००, कांदा पात १२०० २१००, हरभरा २७००.

कडधान्य : अहमदनगर बाजार समितीत मिळालेले दर ज्वारी २४०० – ३५००, बाजरी २१०० २७००, तूर ७००० – ८५००, हरभरा ४६०० – ५३००, मुग ५२०० – ८५००, उडिद ७५०० – ७५००, कुलथी १४५०० १६०००, मिरची १८०० – २३३००, गहू २४५० २८००, एरंडी ५०५०, सोयाबीन ४२०० – ४६५०, मका २००० २२००.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24