Ahmednagar News : मित्रांनो, नवोदित शिंदे सरकार (Eknath Shinde) राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (Subsidy) म्हणून 50 हजार रुपयांची रक्कम देणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, ठाकरे सरकारने (Thackeray Government) सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत (Mahatma Jyotirao Phule Farmer Loan Waiver Scheme) राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली.
त्यावेळी तत्कालीन ठाकरे सरकारने राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmer) प्रोत्साहन म्हणून हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र तदनंतर राज्यात तसेच संपूर्ण देशात कोरोना नामक महाभयंकर आजाराने दस्तक दिल्याने भारतीय अर्थव्यवस्था मंदावली. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत देखील मोठा खळखळाट होता.
अशा परिस्थितीत त्या वेळी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान रक्कम देणे शक्य नव्हते. मध्यँतरी राज्यात सत्ताबदल झाला. सत्तेत नवोदित शिंदे सरकार आले. मात्र शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा प्रोत्साहनपर अनुदानाचा शेतकरी हिताचा निर्णय पूर्ववत केला. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
आता आगामी काही दिवसात पात्र शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष 50 हजार रुपयांचे अनुदान देखील मिळणार आहे. मित्रांनो आता हाती आलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 49961 कर्जदार सभासद लाभार्थी ठरले आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेंडे यांनी माहिती दिली आहे.
प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र शेतकरी कोणते
मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी 2017-2018, 2018-2019, 2019-2020 या कालावधीत कर्जाची नियमित परतफेड केले आहे असे शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र राहणार आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.
खरे पाहता केवळ अहमदनगर नाही अहमदनगर समवेतच 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, परभणी, सांगली, सोलापूर, ठाणे आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शंभर टक्के कर्जदार शेतकरी प्रोत्साहन योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
यामुळे या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. तस पाहता या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ राज्यातील जवळपास 23 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान यामुळे आगामी काही दिवसात दिलासा मिळणार आहे. मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार, राज्यातील 29 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील 23 लाख 5 हजार 865 कर्जदारांपैकी 22 लाख 67 हजार 542 कर्जदार शेतकरी प्रोत्साहन योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत.