कृषी

खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 54 कोटीची मदत जाहीर ; नुकसान भरपाईची मदत सरळ शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रात यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठं नुकसान सहन करावे लागले आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे. सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याच्या मोबदल्यात शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली.

त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले यातून थोडेफार प्रमाणात बचावलेलं पीक ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसात वाया गेले. यामुळे बळीराजाचे संपूर्ण अर्थकारण मोडकळीस आले. अकोला जिल्ह्यातही अशीच परिस्थिती होती. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होऊ लागली.

परिणामी शासनाने देखील ही बाब गांभीर्याने घेत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे झाले नुकसानीचा अहवाल शासन दरबारी जमा झाला. या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांसाठी शासनाच्या महसूल व वन विभागाने 54 कोटी 44 लाख 16 हजाराची मदत मंजूर केली.

विशेष म्हणजे या निधीचे वाटप हे शासन स्तरावरून थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की अकोला जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये 23,851.7 आणि ऑक्टोबर महिन्यात 10,413.9 हेक्टर एवढे क्षेत्र बाधित झाले. आता या क्षेत्रावरील बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची मदत मंजूर झाली आहे.

यामध्ये सप्टेंबर महिन्यासाठी अकोला जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना 34 कोटी 16 लाख 44 हजार आणि ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना 20 कोटी 27 लाख 72 हजार अशी एकूण 54 कोटी 44 लाख 16 हजाराची मदत मंजूर झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा जिल्ह्यातील 74 गावातील 32513 शेतकऱ्यांना फटका बसला होता तसेच ऑक्टोबर महिन्यात 78 गावात 13,747 शेतकऱ्यांना याचा फटका बसला.

आता प्रत्यक्षात या बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून नुकसान भरपाईची मदत जाहीर झाली असून येत्या काही दिवसात बाधित शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यात ही मदत जमा होणार आहे. त्यामुळे साहजिकच बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts