कृषी

Business Idea : भारीच की राव! 5 हजारात या सजावटीच्या झाडाची लागवड करा 4 लाखांची कमाई होणार, कसं ते वाचाच

Business Idea : आज आम्ही शेतकरी बांधवांसाठी  शेतीमधल्या एका बिजनेसची आयडिया (Small Business Idea) घेऊन आलो आहोत. यामध्ये कमी पैसे गुंतवून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. बोन्साय प्लांटचा (Bonsai Plant) हा व्यवसाय (Business News) आहे.

बोन्साय वनस्पती आजकाल शुभ मानली जाते. अशा परिस्थितीत या प्लांटद्वारे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला तुम्ही बोन्सायची लागवड (Bonsai Tree Farming) कशी करू शकता आणि यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागेल? याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

बोन्साय प्लांट लकी मानले गेल्यामुळे आजकाल त्याचा वापर घर आणि ऑफिसमध्ये सजावटीसाठीही केला जात आहे. त्यामुळेच त्याची मागणीही मोठी आहे. बाजारात त्याची किंमत 200 ते 2500 रुपयांपर्यंत असू शकते. बोन्साय वनस्पतीसाठी अनेक शौकीन लोक तोंडची किंमत मोजायला तयार आहेत.

अशा परिस्थितीत हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी (Farmer) देखील फायद्याचा ठरणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की बोनसाय प्लांट तुम्ही स्वतः तुमच्या शेतात तयार करून विक्री करु शकतात आणि चांगला मोठा नफा कमवू शकतात. मात्र यासाठी थोडाकाळ वाट पहावी लागते.

कारण की बोन्साय रोप (Bonsai Tree) तयार होण्यासाठी दोन ते पाच वर्षे लागतात. मात्र तुम्हाला लवकरात लवकर या व्यवसायातून कमाई करायची असेल तर आपण रोपवाटिकेतून तयार रोपे विकत आणून 30 ते 50 टक्के अधिक किमतीत त्याला विकू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पाणी, वालुकामय माती, भांडे आणि काचेचे भांडे, जमीन किंवा छप्पर (100 ते 150 चौरस फूट), पातळ वायर, झाडांवर पाणी फवारण्यासाठी स्प्रे बाटली आणि शेड बनवण्यासाठी जाळी लागेल.

जर तुम्ही हा व्यवसाय छोट्या प्रमाणावर केला तर तुम्हाला 5 हजार रुपये गुंतवावे लागतील. थोडे मोठे काम करण्यासाठी 20 ते 25 हजार लागतील. बोन्साय प्लांट तयार करण्यासाठी तीन वर्षांत सरासरी 240 रुपये खर्च येईल. यामध्ये सरकारकडून प्रति रोप 120 रुपये मदत केली जाणार आहे.

50 टक्के सरकारी मदतीमध्ये 60 टक्के केंद्र आणि 40 टक्के राज्य वाटून घेतील. बोन्सायच्या गरजेनुसार आणि प्रजातींनुसार तुम्ही एक हेक्टरमध्ये 1500 ते 2500 झाडे लावू शकता. यासह, तुम्हाला 4 वर्षांनंतर 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न मिळेल. विशेष म्हणजे दरवर्षी प्रत्यारोपणाची गरज भासणार नाही, मित्रांनो ही झाडे सुमारे 40 वर्षे टिकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts