कृषी

Business Idea: शेतकरी पुत्रांनो नोकरींला दुरूनच करा प्रणाम…! ‘या’ झाडाची चार एकरात लागवड करा, 50 लाखांची कमाई होणारं, कसं वाचा इथं

Business Idea: मित्रांनो सध्या देशातील प्रत्येकजण कमाईचे अनेक नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील प्रत्येक जण कमाईचे दोन मार्ग शोधण्यासाठी धडपडत आहे आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) देखील अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) कमावण्याची नवं-नवीन मार्गांचा शोध घेत आहेत.

मित्रांनो शेतकऱ्यांच्या मते, एकच पीक शेतीत (Farming) लागवड करून त्यांना फारसा फायदा होत नाही. यामुळे शेतकरी बांधव मिश्र शेतीचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश शेतकरी आपल्या पारंपारिक पिकासोबतच (Traditional Crop) शेतात झाडे लागवड करत आहेत.

मात्र अनेक शेतकरी बांधवांना या संबंधित माहितीचा अभाव असल्याने कोणती झाडे लावावी याबाबत सदैव संभ्रमात असतात. परंतु आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एका झाडाच्या लागवडी विषयी सविस्तर माहिती घेऊन हजर झालो आहोत.

मित्रांनो आज आपण मलबार नीम (Malabar Neem Farming) या झाडाच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

शेतकरी मित्रांनो खरं पाहता, आपल्या देशात अनेक शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून चांगला पैसा कमवीत आहेत. मात्र अशी झाडे जसे की, सागवान आणि सफेडा या दोन झाडांना देखील खूप मागणी आहे पण त्यांचे फायदे आणि तोटे देखील आहेत.

मित्रांनो आम्ही सांगू इच्छितो की, सागवान वाढण्यास सुमारे 25 वर्षे लागतात आणि सफेदाच्या म्हणजे निलगिरीच्या झाडाला भरपूर पाणी लागते. त्यामुळे ते शेतातील ओलावा शोषून घेते, ज्यामुळे पिकावर परिणाम होतो.

यामुळे आज आपण मलबार नीम या झाडाच्या शेतीविषयक जाणून घेणार आहोत. मित्रांनो या झाडाची लागवड करून शेतकरी बांधव आपल्या जमिनीची हानी न करता आणि इतर झाडांपेक्षा कमी कालावधीत चांगला पैसा कमवू शकणार आहेत.

मलबार कडुलिंबाचे झाड

हे मलबार कडुलिंबाचे झाड आहे, जे सामान्य कडुलिंबापेक्षा थोडे वेगळे आहे. सर्व प्रकारच्या जमिनीत याची लागवड सहज करता येते. याला जास्त पाणी लागत नाही, कमी पाण्यात ते चांगले वाढू शकते.

मार्च आणि एप्रिल महिन्यात या झाडाचे बिया लावल्या तर चांगले असते आणि या कालावधीत लागवड केल्यास त्यातून चांगले उत्पादन देखील मिळते, म्हणजेच झाडांची चांगली वाढ होते. मित्रांनो आम्ही इथे नमूद करू इच्छितो की, हे झाड खूप वेगाने वाढते. मलबार कडुलिंबाच्या लाकडाला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या झाडाचे लाकूड मुख्यता प्लायवूड उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

मलबार कडुलिंबाचे झाड कसे लावायचे

मलबार कडुनिंबाच्या 4 एकर क्षेत्रामध्ये 5 हजार झाडे लावता येतील, त्यापैकी 2 हजार झाडे शेताबाहेरील कड्यावर म्हणजे बांधावर तर 3 हजार झाडे शेताच्या आत लावता येतील.

किती कमाई होणारं 

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, मलबार कडुलिंबाचे झाड जवळपास आठ वर्षात पूर्ण विकसित होते आणि त्यावेळी या झाडाचे लाकूड विकण्यासाठी योग्य असते. जर शेतकरी बांधवांनी या झाडाची 4 एकरात शेती केली तर त्यांना जवळपास 50 लाख रुपये कमाई होणारं आहे. निश्चितच या झाडाची शेती करून शेतकरी बांधव आपले लखपती बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts