कृषी

Cauliflower Farming: फुलकोबीची शेती शेतकऱ्यांना मालामाल करणार..! फक्त ‘हे’ काम करावं लागणार, लाखोंची कमाई होणारं

Cauliflower Farming: भारतात गेल्या अनेक दशकांपासून भाजीपाला शेती (Vegetable Farming) व्यावसायिक स्तरावर केली जाऊ लागली आहे. भाजीपाला पिक (Vegetable crop) अल्प कालावधीत तयार होत असल्याने शेतकरी बांधव (Farmer) भाजीपाला लागवडीस अधिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत भाजीपाला पीक पूर्णपणे विकसित होते आणि शेतकरी बांधवांना उत्पादन मिळण्यास सुरवात होते यामुळे शेतकरी बांधव आता भाजीपाला लागवडीकडे वळत आहेत. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना भाजीपाला लागवड करण्याचा सल्ला देत असतात.

मित्रांनो फुलकोबी (Cauliflower Crop) हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. याची शेती (Farming) देखील शेतकरी बांधवांना निश्‍चितच फायदेशीर ठरते. मात्र फुलकोबी शेतीतून जर शेतकरी बांधवांना अधिक उत्पन्न (Farmer Income) मिळवायचे असेल तर शेतकरी बांधवांनी काही गोष्टींची काळजी घेणे देखील अपरिहार्य बाब आहे.

आज आपण फुलकोबी लागवड केल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया फुलकोबी शेतीमधील (Agriculture News) काही महत्वाच्या बाबी.

फुलकोबी शेतीत या गोष्टींची काळजी घ्या:- फुलकोबी पीक जास्त ओलावा सहन करू शकत नाही, यामुळे शेतात पाणी साचलेले असल्यास पाणी काढून टाकल्यानंतर शेत कोरडे करा आणि जेव्हा हलका ओलावा असेल तेव्हा फुलकोबीची पुनर्लावणी करावी. तसेच वावरात पावसाच्या पाण्याची निचरा होण्याची व्यवस्था किंवा वावराबाहेर पाणी काढण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

लागवडीपूर्वी शेतात खोल नांगरणी करून तणनाशकाची फवारणी करावी, जेणेकरून नंतर तणांची वेगळी काळजी करावी लागणार नाही. नांगरणीनंतर शेतात टाकण्यासाठी 100 किलो शेणखत किंवा शेणखतामध्ये एक किलो टायकोडर्मा मिसळून 7 ते 8 दिवसांनी शेतात टाकावे.

फुलकोबीची पेरणी किंवा पुनर्लागवड उंच बेड किंवा वरंबा करून करावी, यामुळे तण काढणे सोपे जाते आणि पिकात पाणी साचत नाही. शेतकरी बांधवांनी देखील फुलकोबी पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. फुलकोबी रोपवाटिका तयार केल्यावर पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांत रोपे तयार होतात. शेत तयार केल्यानंतर ते एका ओळीत लावावेत.

फुलकोबी पीक व्यवस्थापनात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण बदलत्या हंगामात पिकावरील किडी व रोगांमुळे उत्पादनाचे नुकसान होऊ शकते.अशा परिस्थितीत सेंद्रिय कीटकनाशकांच्या साहाय्याने शेती करा, ज्यामुळे कमी तोट्यात आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळेल.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts