कृषी

Clove Farming : खरीप हंगामामध्ये करा औषधी गुणधर्मांनी भरलेल्या या मसाल्याची लागवड, मिळेल लाखोंचा नफा

Clove Farming : देशात सध्या आता मान्सून सर्वत्र सक्रिय होईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी शेतीकामे करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मसाल्याच्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

भारत हा मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक प्रकारचे मसाले बनवले जातात. मसाला बनवण्यासाठी लवंग देखील मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तुम्ही लवंग शेती करून चांगला नफा कमवू शकता.

लवंग भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये वापरली जाते. तसेच लवंगमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. लवंग रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास देखील मदत करते. लवंगमध्ये पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे देखील गुणधर्म आहेत.

लवंगमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते. लवंगाची लागवड केल्यास तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो तसेच याला बाजारात मागणी देखील चांगली आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये लवंगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यापासून अनेक सौंदर्य प्रसाधने देखील बनवली जातात. जर तुम्ही लवंगाची खरीप हंगामध्ये लागवड केली तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

लवंग लागवडीसाठी हवामान

लवंग लागवडीसाठी 10 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान असणे आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही यावरून समजू शकता की लवंगची लागवड उष्ण प्रदेशातच केली जाऊ शकते. झाडाच्या वाढीसाठी 30 ते 35 अंश तापमान आवश्यक आहे. जर तुमच्याकडे थंड वातावरण असेल तर त्याची लागवड करणे टाळावे.

लवंगाची पेरणी कशी होते

लवंग पेरणीसाठी सर्वात प्रथम तुम्हाला बियाणे आणणे आवश्यक आहे. पेरणी करायच्या दिवसाच्या एक दिवस आधी पाण्यात भिजत ठेवा. १० सेमी अंतरावर तुम्ही लागवड करू शकता. तसेच शक्यतो सेंद्रिय खतांचा वापर करा. जर तुम्ही झाडांची काळजी घेतली तर ही झाडे तुम्हाला दीर्घकाळ उत्पादन देऊ शकतात.

लवंगाच्या शेतीतून फायदा

लवंग फळे रोपावर गुच्छात लागतात. त्यांचा रंग लालसर गुलाबी असतो. फुले येण्याआधीच ती फळे तोडली जातात. एकदा रोप वाढल्यानंतर 2 ते 3 किलोपर्यंत तुम्हाला उत्पादन मिळू शकते. त्याचबरोबर बाजारात एक किलो लवंगीची किंमत 800 ते 1000 रुपये आहे. त्यामुळे जर तुम्ही लवंगाची लागवड केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

लवंगाचे महत्त्व आणि उपयोग

देशात मोठ्या प्रमाणात लवंगाची लागवड केली जाते. तसेच त्याचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. हिंदू धर्मातील धार्मिक पूजेमध्ये देखील लवंगाचा वापर केला जातो. तसेच टूथपेस्ट, दातदुखीवर औषध, पोट आणि तोंडाच्या आजारांवर औषध म्हणून लवंगाचा वापर केला जातो.

लवंग खाण्याचे काय फायदे 

लवंगांचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगण्यात आले आहेत. लवंगाचे सेवन केल्याने भूक वाढते, उलट्या थांबतात, पोटातील वायू, खोकला, अति तहान आणि कफ-पित्त दोष दूर होतात. यासोबतच रक्ताचे विकार, श्‍वसनाचे आजार, हिचकी, क्षयरोग यांवरही लवंगाचा वापर केल्याने फायदे मिळतात.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts