कृषी

Cotton Farming: बातमी कामाची! कापूस पिकावर गुलाबी बोंड अळी किडीचे सावट दिसताच ‘ही’ फवारणी करा, किडीचा नायनाट होणारं

Cotton Farming: कापूस (Cotton Crop) हे भारतातील एक मुख्य पीक आहे. आपल्या राज्यात देखील कापसाची शेती (Cotton Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. खरीप हंगामात (Kharif Season) लागवड केल्या जाणाऱ्या कापूस या मुख्य पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून आहे. राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यात कापसाची शेती बघायला मिळते.

या वर्षी कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. जाणकार लोकांच्या मते, गत वर्षी कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव (Cotton Market Price) मिळाला असल्याने या वर्षी कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली असावी. मात्र असे असले, तरी गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे कापसाच्या पिकाची मोठी हानी झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील कापूस पिकं पाण्याखाली गेले आहे. यामुळे कापसाच्या उत्पादनात (Cotton Production) जर घट झाली तर यावर्षी देखील कापसाला समाधानकारक बाजार भाव मिळू शकतो.

अशा परिस्थितीत सध्या स्थितीत ज्या शेतकऱ्यांचे कापूस पीक जोमात आहे त्या शेतकरी बांधवांनी कापसाच्या पिकाचे योग्य व्यवस्थापन (Cotton Crop Management) करणे आदी महत्त्वाचे ठरणार आहे. तसेचं गेल्या अनेक वर्षांपासून कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा (Pink Bollworm) प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकरी बांधवांना गुलाबी बोंड आळी वर देखील लक्ष ठेवून राहावे लागणार आहे. शिवाय कापसाच्या शेतात गुलाबी बोंड आळीचे सावट नजरेस पडतात शेतकरी बांधवांनी योग्य त्या उपाययोजना करून या किडीवर वेळीच नियंत्रण मिळवणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी गुलाबी बोंड आळी वर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावे या विषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

गुलाबी बोंड आळीवर नियंत्रण कसं मिळणार बरं…! 

गुलाबी बोंडअळीच्या अळ्या जुन्या पिकाच्या देठामध्ये राहतात आणि नवीन पिकावर त्यांचे जीवनचक्र पूर्ण करतात आणि वाढत्या कापूस पिकात अंडी घालतात. नवीन अळ्या फक्त कळ्या किंवा फुलांना खातात. पिकाला कळ्या किंवा फुले नसतील तर ही अळी पिकाला कोणतीही हानी न करता मरण पावते. यामुळे जाणकार लोक कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना सल्ला देतात की, या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाची उशिरा पेरणी करावी. या किडीचा प्रादुर्भाव कपाशीवर फुलोरा अवस्थेत व फुल लागल्यानंतर होतो.

संक्रमित फुले, कळ्या आणि लहान कापसाचे बोन्डे खाली पडतात. अळ्या बॉलमध्ये प्रवेश करतात आणि शाखा आणि बियांचे नुकसान करतात. ज्या फुल आणि कळीमध्ये कीटक दिसतो ते तोडून नष्ट करण्याचा सल्ला जाणकार लोकांकडून दिला जातो. कापसासाठी घातक ठरणाऱ्या गुलाबी बोंड अळीचा नायनाट करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी कृषी शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकाची फवारणी करावी.

कापूस उत्पादक शेतकरी बांधव सायपरमेथ्रीन 10 EC 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 EC 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकतात. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, कोणत्या औषधाची फवारणी करण्याअगोदर कृषी तज्ञांचा तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा आणि कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. आम्ही दिलेली माहिती ही अंतिम राहणार नाही

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts