Cotton Farming: भारतात फार पूर्वीपासून शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Cotton Cultivation) करत आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करत असतात. राज्यातील मराठवाडा विदर्भ, खानदेश, तसंच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Farming) नजरेस पडते.
गत वर्षी कापसाला चांगला विक्रमी बाजारभाव (Cotton Rate) मिळाल्याने या वर्षी कापसाचे लागवडीखालील क्षेत्र वाढणार असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. खरं पाहता, जागतिक बाजारपेठेत कापसाला कधी नव्हे ती मोठी मागणी आली यामुळे देशांतर्गत कापसाच्या बाजार भावात मोठी वाढ झाली होती.
अशा परिस्थितीत या वर्षीसुद्धा कापसाच्या बाजार भावात तेजी राहणार असल्याचा तज्ञांचा अंदाज असल्याने कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. कापसाची वाढती मागणी आणि उपयुक्तता यामुळे या पिकाला पांढरे सोने असेही म्हणतात. आपल्या देशात कापसाची लागवड ही खरीप हंगामात (Kharif Season) केली जाते.
बागायती भागात मे महिन्यात पेरणी केली जाते, परंतु जिरायती भागात मान्सूनच्या पावसानंतरच पेरणी करण्याची शिफारस केली जाते. त्याच्या लागवडीतून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी, पेरणी किमान 50 सेमी पाऊस झाल्यानंतरच करावी.
कापसाच्या चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या पावसाबरोबरच पेरणीचे योग्य तंत्र जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामध्ये बीजप्रक्रिया करून पेरणी करावी, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. बीजप्रक्रिया केल्याने उगवणीपासून काढणीपर्यंत कीड आणि रोगांचा धोका कमी होतो आणि निरोगी उत्पादन मिळते.
कापूस बियाण्यांवर बीजप्रक्रिया
कापूस पिकावर अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे पिकाचा दर्जा खराब होऊन उत्पादनातही घट येते असे अनेकदा दिसून येते. या समस्यांना तोंड देण्यासाठी, बियाणे प्रक्रिया करणे चांगले असते, ज्यामध्ये रासायनिक औषधांनी बियाणे साफ करणे आणि लेप लावणे समाविष्ट आहे.
•5 ग्रॅम एमिसन आणि 1 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिनमध्ये सल्फ्यूरिक ऍसिड घालून द्रावण तयार करा. या द्रावणात 10 लिटर पाणी मिसळून बियाण भिजवा. बियाणे सुमारे 8-10 तास भिजवून ठेवल्यानंतर, ते रासायनिक मिश्रणातून काढून टाका आणि सावलीत वाळवा. लक्षात ठेवा की, बीजप्रक्रिया केल्यानंतर कापसाची पेरणी संध्याकाळीच करावी. शेतकर्यांना हवे असल्यास ते बियाण्याची चांगली उगवण आणि जमिनीत जमा होण्यासाठी 10 लिटर पाण्यात 5 ग्रॅम सुक्सीनिक ऍसिड टाकून उपचार करू शकतात.
•कापूस पिकात दीमक प्रतिबंधासाठी 10 मि.लि. क्लोरपायरीफॉस 20% EC किंवा 5 मि.ली. इमिडाक्लोप्रिड किंवा 5 मि.ली. फिप्रोनिल 10 लिटर पाण्यात विरघळवून बियांवर फवारणी करावी.
•पिकामध्ये कुजल्यामुळे होणारे रोग आणि बुरशीजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा विर्डी किंवा 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम (बाविस्टिन 50% डब्ल्यूपी) एक किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करून पेरणी करावी.
•कपाशीच्या झाडातील शोषक किडींच्या प्रतिबंधासाठी बियाण्यांना इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमेथोक्सम 7 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रीया करा, असे केल्याने कीटक पिकाच्या आजूबाजूलाही भटकत नाहीत.
•जर तुम्ही कमी पाणी असलेल्या जिरायती क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड करत असाल, तर इजेक्टोबॅक्टर कल्चरची बीजप्रक्रिया करून पेरणी केल्यास पिकाचे अधिक उत्पादन मिळण्यास मदत होईल.