Cotton Farming: भारतात सर्वत्र कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड (Cotton Cultivation) केली जाते. आपल्या राज्यात देखील कापसाचे क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे कापूस हे पीक खरीप हंगामातील (Kharip Season) मुख्य पीक आहे.
राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण कापूस या मुख्य पिकावर (Cotton Crop) अवलंबून असते. अशा परिस्थितीत कापूस पिकात लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकरी बांधवांना बारीक लक्ष ठेवावे लागते. मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत होता.
यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती देखील बघायला मिळाली. मित्रांनो राज्यातील काही भागात पावसामुळे समाधान व्यक्त केले जात आहे तर काही भागात अतिवृष्टीसारख्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
दरम्यान राज्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कापूस या मुख्य पिकावर रोगराईचे सावट बघायला मिळत आहे. सध्या कापूस पिकावर पांढरी माशी (White Fly) आणि तुडतुडे (Green Leaf Hopper) कीटक मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. यामुळे कापूस पिकाची हानी होत असते. अशा परिस्थितीत या कीटकांचा वेळीच नायनाट करणे अतिशय महत्त्वाचे ठरते.
पांढरी माशी आणि तुडतुडे कीटकावर असे मिळवा नियंत्रण
मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांच्या मते, पांढऱ्या माशीचे प्रति पान 6-8 प्रौढ आणि 2 तुडतुडे कीटक प्रति पान दिसत असल्यास, फ्लोनिकॅमिड 50 डब्ल्यूजी @ 60 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. यामुळे पांढरी माशी आणि तुडतुडे कीटकांवर नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार असल्याचा कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा दावा आहे.
गुलाबी बोंडअळीवर असं मिळवा नियंत्रण
कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सल्ला देतात की, गुलाबी बोंडअळीचे निरीक्षण करण्यासाठी एकरी 2 फेरोमोन सापळे लावा आणि त्यात पकडलेल्या गुलाबी अळ्यांची 3 दिवसांच्या अंतराने मोजणी करा. जून ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत, तीन दिवसांत प्रत्येक सापळ्यात एकूण 12-15 पतंग आले आणि पीक धूसर झाले, तर कीटकनाशकाची फवारणी करावी लागते. 60 दिवसाच्या पिकावर निंबोळी आधारित कीटकनाशक @ 5 मिली प्रति लिटर पाणी हे प्रमाण घेऊन फवारणी करा.
कापूस पिकाच्या 60 दिवसांनंतर आणि गुलाबी अळीचा प्रादुर्भाव शेंगांच्या भागांवर 5-10% असल्यास प्रोफेनोफॉस (क्युराक्रॉन, सेलक्रॉन, कॅरिना) 50 ईक्यू 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर गरज भासल्यास पुढील फवारणी 10-12 दिवसांनी कुनालफॉस 20 एएफ @ 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून करावी.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारची फवारणी करण्या अगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी तज्ञांचा किंवा कृषी सेवा केंद्र चालक असा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे. आम्ही दिलेली माहिती ही अंतिम राहणार नाही.