Cotton Variety:- खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असून शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रमध्ये खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन या पिकांची लागवड केली जाते. त्यामध्ये कपाशी पिकाच्या दृष्टिकोनातून बघितले तर मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या पट्ट्यामध्ये कपाशीची लागवड सर्वाधिक प्रमाणात केली जाते.
बरेच शेतकरी पाण्याची उपलब्धता असेल तर मेच्या शेवटच्या आठवड्यात कपाशीची लागवड करतात व असे शेतकरी आतापासून कपाशीचे दर्जेदार बियाणे मिळावे याकरिता प्रयत्नशील असल्याचे आपल्याला दिसून येतात. कारण कपाशीचे भरघोस उत्पादन देणारे व दर्जेदार व्हरायटी मिळाली तर उत्पादन चांगले मिळून शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे राहतात व या दृष्टिकोनातून दर्जेदार बियाण्याची निवड करणे गरजेचे असते.
तसे पाहायला गेले तर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कपाशीचे वाण बाजारात विक्रीकरिता उपलब्ध असतात व यामधून योग्य व्हरायटींची निवड करणे खूप गरजेचे असते. याकरिता या लेखात आपण कपाशीच्या काही महत्त्वाच्या व्हरायटींची माहिती थोडक्यात घेऊ.
हे आहेत कपाशीचे भरघोस उत्पादन देणारे वाण
1- सुपर टारगेट( साई भव्य कंपनीचा वाण)- मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या या वरायटीची लागवड केली होती. जर आपण पाहिले तर या जातीपासून सरासरी 15 ते 16 क्विंटल एकरी उत्पादन मिळाले आहे.
तसेच व्यवस्थापन आणि पाण्याची उपलब्धता चांगली असेल तर काही शेतकऱ्यांनी सुपर टारगेट वरायटीच्या माध्यमातून एकरी वीस क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवल्याची माहिती देखील समोर आली आहे.
2- युएस 7067( यूएस ॲग्री सीड्स कंपनीचा वाण)- हि व्हरायटी देखील शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय असून या व्हरायटीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लागवडीनंतर ती काढणीस लवकर तयार होते.
त्यामुळे जर तुम्हाला लवकर काढणीस तयार होणाऱ्या व्हरायटीची लागवड करायची असेल तर तुमच्याकरिता युएस 7067 ही व्हरायटी फायद्याची ठरू शकते.
3- राशी 779( राशी सीड्स कंपनीचा वाण)- महाराष्ट्रात बघितले तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये राशी सीड्स कंपनीचे बरेच वाण हे खूप प्रसिद्ध आहेत. यामध्ये राशी 659 हा वाण देखील खूप प्रसिद्ध असून त्या खालोखाल राशी 779 ही कापसाची व्हरायटी देखील मागच्या वर्षी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी वापरण्यात आलेली होती.
बऱ्याच शेतकऱ्यांनी या व्हरायटीच्या माध्यमातून एका एकरमध्ये 22 ते 25 क्विंटलपर्यंत कापसाचा उतारा मिळवला होता. त्यामुळे राशी 779 ही व्हरायटी देखील शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरू शकते.