कृषी

Cow Farming : पशुपालक बनतील लखपती…! 40 हजारात घरी आणा ‘या’ जातीची गाय, वर्षातील 257 दिवस देते दुध, वाचा सविस्तर

Cow Farming : आपल्या देशात शेती (Farming) आणि त्याला जोड व्यवसाय (Agricultural Business) म्हणून दुग्ध उत्पादन व्यवसाय (Dairy Farming) म्हणजे पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पशुपालन (Animal Husbandry) व्यवसाय हा शेती नंतर सर्वाधिक केला जाणारा व्यवसाय आहे.

या व्यवसायातून शेतकरी बांधवांना (Farmer) अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) मिळत आहे. या व्यवसायाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा व्यवसाय शेती समवेतच करता येत असल्याने शेतकरी बांधवांना या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न अतिरिक्त कमाई ठरत आहे.

मित्रांनो पशुपालन व्यवसायात आपल्या देशात सर्वाधिक गाईंचे पालन (Cow Rearing) केले जाते. गाईचे पालन कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने केले जात असल्याने या व्यवसायाकडे आता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात वळले आहेत. गाय पालन हा व्यवसाय मुख्यतः दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. अशा परिस्थितीत दुधासाठी उत्तम असलेल्या गाईच्या जातींचे (Cow Breed) संगोपन करणे पशुपालक शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरत आहे.

जाणकार लोक देखील पशुपालक शेतकरी बांधवांना सुधारित जातीच्या गाईचे संगोपन करण्याचा सल्ला देत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या महाराष्ट्रातील वाचक शेतकरी मित्रांसाठी गाईच्या एका महाराष्ट्रीयन देशी जातीविषयी माहिती सांगणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

या जातीच्या गाईचे संगोपन शेतकऱ्यांना बनवणार लखपती…!

मित्रांनो, आज आपण गाईच्या लाल कंधारी या जाती विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो खरे पाहता लाल कंधारी ही गाईची एक देशी जात असून या जातीचे संगोपन आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक केले जाते. ही जात महाराष्ट्रमधील असल्याने या जातीला आपल्या महाराष्ट्रातील हवामान अधिक मानवत असल्याचा दावा जाणकार करत असतात.

अशा परिस्थितीत या जातीचे संगोपन महाराष्ट्रातील पशुपालकांना विशेष लाभदायी सिद्ध होत आहे. मित्रांनो ही जात महाराष्ट्रातील कंधार तालुक्यात अधिक आढळत असल्याने या जातीला लालकंधारी असे नाव पडले आहे. असे सांगितले जाते की गाईची ही देशी जात चौथ्या दशकात कंधारचा राजांनी विकसित केली होती. या जातीला लाखलाबुंडा असे देखील म्हटले जाते.

या जातीच्या गाईची किंमत नेमके किती?

पशुपालक शेतकरी बांधवांना आता प्रश्न पडला असेल की या गाईची किंमत नेमकी किती असते? तर आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या जातीच्या गाई ची किंमत ही गाईच्या आरोग्यावर तसेच दूध उत्पादनावर अवलंबून असते. मात्र जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या गाईची किंमत 40 ते 50 हजाराच्या आसपास असते.

मित्रांनो या जातीच्या गाईचे संगोपन करण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही. शिवाय या जातीच्या गाईला जास्त चारा देखील लागत नाही. यामुळे या जातीच्या गायीचे संगोपन कमी खर्चात केले जाऊ शकते. शिवाय यापासून अधिक दूध उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांना या गाईचे संगोपन अधिक फायद्याचे ठरत आहे.

लाल कंधारी गाईच्या विशेषता

या जातीच्या गाई गडद तपकिरी तसेच गडद लाल रंगाच्या असतात. या जातीच्या गाईचे कान हे लांब असतात. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीची गाय ही 235 ते 275 दिवस दूध देत असते.

या जातीच्या गाईचा भाकड काळ किंवा कोरडा कालावधी हा 130 ते 190 दिवस दरम्यान असू शकतो. या जातीची गाय चार लिटर पर्यंत रोज दूध देऊ शकते. या जातीच्या गाई साधारण 45 महिन्यात पहिल्यांदा प्रजननास तयार होतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts