कृषी

Cow Farming Tips : बातमी पशुपालकांसाठी! जनावरांना होणारा लाळ्या खुरकूत आजार लक्षण आणि उपचार पद्धत, सविस्तर जाणून घ्या

Cow Farming Tips : भारतात पशुपालन हा व्‍यवसाय (Animal Husbandry) फार पूर्वीपासून केला जात आहे. शेतीशी (Farming) निगडित असल्याने हा व्यवसाय शेतकरी बांधवांसाठी (Farmer) अधिक फायद्याचा ठरत आहे. पशुपालन व्यवसाय हा मुख्यत्वे दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. या सोबतच पशुपालन व्यवसायातून शेतकरी बांधवांना सेंद्रिय खताची देखील मोठी उपलब्धता होत असते.

अशा पद्धतीने हा व्यवसाय शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळवून देतो. मात्र या व्यवसायात जर यशस्वी व्हायचे असेल तर जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे हे पशुपालकांचे (Livestock Farmer) कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत आज आपण पशुपालक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

मित्रांनो पावसाळ्यात जनावरांना (Animal Care) अनेकदा घटसर्प आणि लाळ्या खुरकूत हे आजार (Cow Disease) होतात. हे दोन्ही आजार झपाट्याने पसरतात. जनावरांना योग्य उपचार न दिल्यास आणि काळजी न घेतल्यास त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे लक्षणे दिसल्यास योग्य उपचार घ्या किंवा जवळच्या पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया घटसर्प आणि लाळ्या खुरकूत या दोन्ही आजाराची लक्षणे आणि उपचार पद्धती.

लाळ्या खुरकूत रोग

लाळ्या खुरकूत रोग प्राण्यांमध्ये झपाट्याने पसरतो. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. पाऊस सुरू झाल्याने जनावरांमध्ये या आजाराचा धोका वाढतो.

लाळ्या खुरकूत रोगाची लक्षणे

दूध उत्पादनात घट.

जीभ बाहेर येणे

गर्भपात होणे 

तोंडातून जास्त लाळ गळणे.

प्राणी चघळणे थांबवते.

संरक्षणाच्या पद्धती

बाधित भाग सोडियम कार्बोनेट पाण्यात मिसळून धुवा.

जनावरांचे ताबडतोब लसीकरण करा आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित उपचार करा.

प्रादुर्भावग्रस्त जनावर ठेवलेल्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी.

दूध काढल्यानंतर हात आणि तोंड साबणाने धुवा.

रोगग्रस्त जनावराला इतर प्राण्यांपासून दूर ठेवा.

घटसर्प रोग

रोगाची लक्षणे दिसल्यानंतर लवकर उपचार सुरू न केल्यास जनावराचा मृत्यू होतो. हा रोग बहुधा गाई व म्हशींना होतो. वातावरणातील बदलामुळे जनावरांना हा आजार होतो.

घटसर्प रोगाची लक्षणे

प्राणी सुस्त होतो.

प्राण्याचे डोळे लाल होऊ लागतात.

डोके, मान आणि दोन्ही पुढच्या पायांमध्ये सूज येणे.

श्वास घेताना कर्कश आवाज.

या आजाराने ग्रस्त असलेल्या प्राण्याला अचानक 105 ते 106 फॅरेनहाइट इतका ताप येतो.

प्राणी खाणे पिणे बंद करतो.

त्याच्या तोंडातून लाळ पडू लागते.

उपाय 

जनावरांना पाणी साचते अशा ठिकाणी जनावरे ठेवल्याने हा आजार होतो.

त्यामुळे जनावरांची जागा किंवा गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा.

रोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकाशी संपर्क साधा.

रोगट जनावरांना इतर प्राण्यांपासून दूर ठेवा कारण हा रोग झपाट्याने पसरतो व प्राणघातक असतो.

दरवर्षी पावसाळ्यात जनावरांना वेसिकल रोगाविरूद्ध लसीकरण करावे.

रोग झाल्यास क्लोराम फोनिकॉल आणि सल्फाडियामिडीन ऑक्सीटेट्रासाइक्लिन सारखी प्रतिजैविके दिली जाऊ शकतात.

हा आजार आढळल्यास लवकरात लवकर उपचार सुरू करा, यामुळे जनावर वाचू शकते.

जनावराचा मृत्यू झालेल्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करावी.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts