Crop Insurance : मित्रांनो या वर्षी शेतकरी बांधवांना (Farmer) नैसर्गिक आपत्तीमुळे (Climate Change) मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यावर्षी मराठवाडा विभागातील (Marathwada) शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) तसेच शंखी गोगलगाय या कीटकांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आता अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागातील धाराशिव अर्थातच उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad) नुकसानग्रस्त आणि पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) मंजूर करण्यात आला आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत (Yojana) नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवांना पिक विमा दिला जातो.
आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील (Kharif Season) पीक विमा काढला असेल त्यां शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
मित्रांनो आता धाराशिव जिल्ह्यातील 14 महसूल मंडळांना पीक विम्याचे 25% आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पिक विमा योजनेमध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की, जर एखाद्या महसूल मंडळाचे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक शेत पिकाचे नुकसान झाले असेल तर अशा मंडळांना पिक विमा साठी पात्र करून 25 टक्के आगाऊ रक्कम संबंधित महसूल मंडळातील पिक विमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते.
आता या पंतप्रधान पिक विमा योजनेच्या तरतुदीनुसार धाराशिव जिल्ह्यातील एकूण चौदा महसूल मंडळ पात्र करण्यात आले असून संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% आगाऊ रक्कम जारी करण्यासाठी अधि सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील कोणती महसूल मंडळे पीक विम्यासाठी झाली पात्र
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मराठवाड्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे तसेच शँखी गोगलगायी या कीटकांमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला आहे.
आता धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पीक विमा योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, मंगळूर, इटकळ, सावरगाव, सलगरा, जळकोट, नळदूर, नारंगवाडी, उमरगा, डाळिंब, मुरूम, लोहारा, मुळद, मापळी, जेवळी ही महसूल मंडळे पात्र करण्यात आली आहेत.
म्हणजेच आता या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पीक विम्याची 25% आगाऊ रक्कम मिळणार आहे. त्यामुळे संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.