कृषी

Crop Insurance: एकच कॉलवर सूटणार आता पिक विम्याची संबंधित सर्व समस्या! वाचा काय आहे सरकारचा प्लॅन?

Crop Insurance:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळत असते. तसेच शेती करताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना देखील तोंड द्यायला लागते.

यामध्ये प्रामुख्याने अवकाळी पाऊस तसेच वादळी वारे, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांची हातात आलेली पिके मोठ्या प्रमाणावर उध्वस्त होतात व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान टाळण्याकरिता व शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी किंवा आर्थिक आधार मिळावा याकरिता पंतप्रधान पिक विमा योजना सरकारकडून राबविण्यात येत असून या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे कव्हर मिळते.

आपल्याला बरेचदा आता दिसून येत आहे की, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. परंतु जेव्हा या नुकसानीचे दावे दाखल करण्यात येतात तेव्हा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर  समस्यांना तोंड द्यायला लागते. अनेक प्रकारच्या किचकट अटी टाकून  दावेदेखील दाखल केले जात नाही आणि दावे दाखल केले गेले तर वेळेला विम्याची रक्कम मिळेलच याची कुठल्याही प्रकारची शाश्वती आपल्याला दिसून येत नाही.

या आणि अशा अनेक प्रकारच्या समस्या समोर उभ्या टाकतात व यामुळेच आता केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक टोल फ्री क्रमांक जारी केला असून त्या माध्यमातून आता पिक विम्याच्या दाव्यांच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मदत होणार आहे.

 पुढील आठवड्यात सुरू होऊ शकतो टोल फ्री क्रमांक

जेव्हा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.त्यानंतर शेतकऱ्यांकडून क्लेम दाखल केला जातो परंतु त्या क्लेमची स्थिती नेमकी काय आहे हे शेतकऱ्यांना समजत नाही. याबाबत विमा कधी मिळेल किंवा याबाबतची सध्या प्रोसेस काय आहे? ही देखील माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही.

त्यामुळे आता अशा सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून एक मेसेज संबंधीच्या काही समस्या असतील त्या आता एका फोन कॉलवर सोडवल्या जाणार आहेत. याकरिता 14447 हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येणार असून त्यावर एक कॉल करणे गरजेचे राहील. त्यानंतर तुम्ही या संबंधित कागदपत्रे आणि नैसर्गिक आपत्तीची माहिती तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर एक ओळखपत्र दिले जाईल.

त्यानंतर तुम्ही या टोल फ्री क्रमांक वर तक्रार रजिस्टर केल्यानंतर यासंबंधीचा एसएमएस देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. या प्रक्रियेनंतर जेव्हा शेतकऱ्याला त्याच्या तक्रारीचा पाठपुरावा करायचा असेल तेव्हा त्या ठिकाणी कॉल करून तुम्हाला मिळालेला आयडी सांगावा लागेल व त्यानंतर शेतकऱ्याला संपूर्ण पिक विम्याची स्थिती कळण्यास मदत होईल.

नुकताच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विमा दाव्याच्या संबंधित असलेल्या तक्रारींच्या निवारण करण्याच्या कामी छत्तीसगडमध्ये पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला होता व तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे तो आता संपूर्ण देशासाठी लॉन्च केला जाणार आहे. साधारणपणे याचे संपूर्णपणे तयारी करण्यात आली असून पुढच्या आठवड्यात तो सुरू होईल अशी शक्यता आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts