Dairy Business Scheme:- कृषी आणि कृषीशी संबंधित असलेल्या व्यवसायांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणामध्ये योजनांची आखणी करण्यात आलेली असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे.
शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांचा विकास व्हावा व त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचा प्रयत्न आपल्याला या माध्यमातून दिसून येतो. विविध माध्यमातून किंवा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरामध्ये किंवा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना कृषीशी संबंधित कार्य किंवा कृषीपूरक व्यवसाय करणे फार सोपे जाते.
त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. आता तुम्हाला जर दूध व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला गाय किंवा म्हशीचे पालन करणे गरजेचे असते. परंतु जर आज गाय किंवा म्हैस यांच्या किमती पाहिल्या तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेर आहेत.
परंतु यामध्ये आता चिंता करण्याची गरज नसून तुम्हाला जर पशुपालन किंवा दूध व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला पशु किसान क्रेडिट कार्ड यामध्ये मदत करू शकते. याचा अनुषंगाने आपण याविषयीचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेणार आहोत.
काय आहे पशु किसान क्रेडिट कार्ड?
केंद्र सरकारने 2024 या वर्षापासून पशुपालकांकरिता पशु किसान क्रेडिट कार्ड वाटपाची योजना सुरू केली असून या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करण्याकरिता शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळते. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या बजेटनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
साधारणपणे एक गाय खरेदी करिता साठ हजार 783 रुपये तर एक म्हैस खरेदीकरिता 70249 रुपये कर्ज मिळते. त्यामुळे साहजिकच शेतकरी डेअरी व्यवसायाला सुरुवात करू शकतात. विशेष म्हणजे या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून गाय आणि म्हैस खरेदी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या एक लाख साठ हजार रुपये करता वर तुम्हाला शून्य टक्के व्याज आकारले जाते. तसे पाहायला गेले तर यामध्ये सात टक्के व्याजदराने हे कर्ज मिळत असते. परंतु यामध्ये केंद्र सरकार तीन टक्के आणि राज्य सरकार चार टक्के व्याज भरते.
या योजनेच्या काही अटी
महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी घेतलेले हे कर्ज पाच वर्षाच्या कालावधीत परतफेड करणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केली तरच त्यांना व्याजामध्ये सूट मिळणार आहे.
पशु किसान क्रेडिट कार्डसाठी कसा करावा अर्ज?
यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन या संबंधीची माहिती घ्यावी लागेल व त्या ठिकाणाहून या योजनेचा अर्ज घ्यावा. सांगितलेली सर्व कागदपत्र सोडून अर्ज व्यवस्थित भरून बँकेच्या अधिकाऱ्यांकडे तो कागदपत्रांसहित जमा करणे गरजेचे आहे. तुमचा अर्ज पूर्ण झाल्यानंतर सर्व कागदपत्रे योग्य असेल व तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पशु किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.
लागतात ही कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे. त्यासोबत पशु आरोग्य प्रमाणपत्र, आपल्या पशुचे विमा प्रमाणपत्र, सिबिल स्कोर उत्तम असणे, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि मोबाईल नंबर आवश्यक असतो.
अशा पद्धतीने तुम्ही पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बिनव्याजी कर्जाचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसाय सुरू करू शकता.