अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात चढ उतरण सारखीच चालू आहे. हंगामाच्या सुरुवातीला कांद्याला विक्रमी दर आले होते.
खरिपातील लाल कांद्यानंतर लगेच उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु झाली. आणि कांद्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे कांद्याचे दर घसले.
तर त्यामुळे 33 रुपये किलो जाणारा कांदा आता 9 रुपयांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आसून शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे कांदा साठवणूक केल्यास भविष्यात होणाऱ्या वाढीव कांदा दराचा फायदा शेतकरी घेवू शकणार आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांनी कांद्याचे योग्य प्रकारे संरक्षण, साठवणूक करणे गरजेचे आहे.अनेक शेतकरी हे कांदा साठवण्यासाठी कांदा चाळीचा आधार घेऊन लागले आहेत.
कांदा चाळीत किमान 8 ते 9 महिने कांदा साठवता येतो. कांदा हा नाशवंत आहे. त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आसते.
कांदा चाळीतील कांदा सडू नये म्हणून एकाच ठिकणी अधिकच्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करु नये. शिवाय साठवणूक करण्यापूर्वी कांदा हा तीन ते चार वेळेस कडक ऊन्हामध्ये वाळवणे गरजेचे आसते.
कांदा वाळवल्यानंतर लगेच तो गोण्यामध्ये भरुन ठेऊ नये किंवा ढीग घालून एकत्र ठेऊ नका. तर त्यामुळे ढीगाच्या खाली असलेला कांदा सडण्याची शक्यता असते.
कांदा चाळीत ठेवलेल्या कांद्याची वेळोवेळी देखभाल करणे आवश्यक आहे. त्यामुळे कांदा किमान जो कांदा खराब झाला आहे त्याला बाहेर काढून इतर कांद्यापासून दूर ठेवावे. जेणेकरुन इतर कांदे सडणार नाहीत.