कृषी

Drone Farming : ड्रोन शेतीमुळे बदलणार शेतकऱ्यांचे आयुष्य, कमी परिश्रम, मजूर टंचाईवर होणार मात

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- सध्याच्या काळात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. यामुळे अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठे बदल होत असल्याचे दिसून येत आहे. यांत्रिकीकरण वाढले आहे.

त्यात शेतीमध्ये कमी श्रमाचा वापर करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने आजचा शेतकरी हा जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता घेईल त्याच्याकडे आपले लक्ष्य केंद्रीत करताना दिसत आहे.

वाढत्या तंत्रज्ञानाचे पडसाद कृषी क्षेत्रात जाणवू लागले असून कृषी क्षेत्रात अनेक देश ड्रोनचा वापर करत आहे. तर भारतामध्ये देखील केंद्र सरकारने कृषिक्षेत्रात ड्रोन वापरण्यास परवानगी दिल्याने भारतातील कृषी क्षेत्रात त्याचा वापर वाढत असून केंद्र सरकारने त्याबाबत अर्थसंकल्पीय धोरणात तशी तरतूद केली आहे.

त्यामागील सरकारचा उद्देश कृषी क्षेत्रात आधुनिक यांत्रिकीकरणाचा वापर अधिक कसा करता येईल, आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवण्यासाठी कसा होईल याकडे सरकारने लक्ष दिले आहे.

भारतात गेल्या दोन-तीन वर्षापासून खाजगी आणि सरकारी संस्थांमार्फत देशात वेगवेगळ्या भागात ड्रोनच्या चाचण्या सुरू होत्या. या चाचण्यांचे परिणाम हे प्रभावशाली आले असून आता थेट केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात ड्रोन वापरण्यास परवानगी दिली आहे.

तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये ड्रोन वापराबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या असून ड्रोन शक्तीसाठी स्टार्ट प्रमोट केले जाणार आहे.

याद्वारे ट्रेन लाईक सर्विस म्हणून वापरण्याचे काम करण्यात येईल. तर त्याचा वापर कृषी क्षेत्रातील पीकांचे मुल्यांकन, भूमी अभिलेखचे डिजिटायझेशन, किटकनाशके किंवा पोषक तत्वांच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

ड्रोनच्या सहाय्याने मातीचे परीक्षण मातीचे विश्लेषण केले जाऊ शकते त्यामुळे मातीमध्ये योग्य पीक येण्यास मदत होते. हवामानातील बदलामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होत असते त्या काळात पिकांचे आरोग्य पाहण्याचे काम ड्रोनच्या मदतीने करता येते.

शेतातील पिकांवरील कीड आणि रोग यावर औषध फवारणी तर शेताला खत पसरवण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो. थर्मल, हाइपर् स्पेक्ट्रल या सेन्सर च्या साह्याने जमिनीत ओलाव्याची कमतरता असणारा भाग शोधून काढतो.

पिकांची व पशुधनाच्या हालचालींची माहिती देण्याचे काम ड्रोन करतो. पिक लागवडीतही ड्रोनचा वापर होतो. अनेक मजुरांचे काम ड्रोन यंत्राच्या सहाय्याने करता येते. यामुळे सध्या मजूर टंचाईची समस्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे. ड्रोन खरेदीसाठी सरकार अनुदान देखील देत असल्याने ड्रोन फायदेशीर ठरणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts