कृषी

Drone Subsidy: 80 टक्के अनुदानावर मिळवा फवारणी ड्रोन आणि एकरची फवारणी करा 7 मिनिटात! वाचा माहिती

Drone Subsidy:- शेती आता आधुनिक पद्धतीने केली जावू लागली आहे व यामध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या प्रकारचे यंत्रे विकसित झाल्यामुळे यंत्रांच्या माध्यमातून शेतीची अनेक कामे आता होऊ लागले आहेत व या तंत्र व यंत्रांच्या मदतीने कमीतकमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस असे आर्थिक उत्पन्न मिळवण्यामध्ये शेतकरी यशस्वी झालेले आहेत.

तसेच कृषी यांत्रिकीकरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शेतीची पूर्व मशागती पासून तर पिकांची आंतरमशागत व काढणी याकरिता यंत्रांचा वापर शेतकरी करतात व यंत्रांच्या वापराला प्रोत्साहन मिळावे याकरिता शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देखील दिले जाते.

याच पद्धतीने जर आपण पिकांवर फवारणी करण्यासाठी जर ड्रोनचा विचार केला तर आता ड्रोनचा वापर देखील हळूहळू पिकांच्या फवारणीसाठी वाढू लागला आहे व याकरिता  शासनाच्या माध्यमातून फवारणी ड्रोन करिता अनुदान देखील दिले जात आहे. याच अनुदान योजने विषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.

 पिकांच्या फवारणीसाठी ड्रोनच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल

आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाच्या या युगामध्ये शेतीमधील विविध कामांसाठी वेळ तसेच पैसा व कष्टाची बचत करून यंत्रांचा वापर फायद्याचा ठरताना दिसून येत आहे व पिकांच्या फवारणी करिता आता ड्रोनचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे.

जर आपण ड्रोनचा विचार केला तर तुम्हाला जर एक एकर क्षेत्रावरील पिकाची फवारणी करायची असेल तर तुम्हाला फक्त सात मिनिटांचा कालावधी यासाठी लागतो.

म्हणजेच यामुळे तुमचे औषध तसेच पाणी व मनुष्यबळाच्या खर्चामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बचत होते. विशेष म्हणजे आता शेतकऱ्यांना देखील स्वतःचा ड्रोन खरेदी करणे शक्य आहे व याकरिता 40% पासून ते 80% पर्यंत अनुदान देखील मिळत आहे.

 ड्रोन खरेदीसाठी काय आहे महत्त्वाची योजना?

तुम्ही देखील तुमच्या शेताच्या वापराकरिता शासकीय अनुदान घेऊन ड्रोन खरेदी करू शकतात व याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान दिले जात आहे.

जर आपण गरुडा या कंपनीच्या ड्रोन ची किंमत पाहिली तर ती आठ लाख 17 हजार रुपये आहे व परवान्यासाठी तुम्हाला साठ हजार रुपये इतका खर्च येतो. म्हणजेच गरुडा कंपनीचा ड्रोन तुम्हाला साधारणपणे नऊ लाख रुपयांपर्यंत येतो. या नऊ लाखांवर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.

 कसे आहे ड्रोन वर मिळणारे अनुदानाचे स्वरूप?

तुम्हाला शेतीकरिता ड्रोन खरेदी करायचा असेल तर यामध्ये 40 ते ऐंशी टक्क्यांपर्यंत यामध्ये अनुदान दिले जाते. महिला बचत गटांकरिता 80 टक्के अनुदान दिले जाते तर फार्मा प्रोड्युसर कंपनींना 75 टक्के अनुदान मिळते. तसेच बीएससी ऍग्रीचे विद्यार्थी असतील तर त्यांना 50 टक्के व सर्वसामान्य शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान या माध्यमातून मिळते.

समजा तुम्हाला कर्ज घेऊन ड्रोन घ्यायचा असेल तर 90% पर्यंत तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळते. ड्रोन करिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष प्रकारच्या योजना देखील राबवण्यात येत असून आता हळूहळू ड्रोन फवारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतांना दिसून येत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts