कृषी

ई- बायडर करेल आता पिकांमधील तण काढण्यास मदत! शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे हे चार्जेबल मशीन

कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून कृषी क्षेत्रातील अनेक कामांकरिता वेगवेगळ्या प्रकारचे कृषी यंत्र विकसित करण्यात आलेले आहेत. यामध्ये जमिनीची पूर्व मशागत आणि पिकांची लागवड, आंतरमशागत आणि काढणीसाठी अनेक उपयुक्त यंत्रे आता कृषी क्षेत्रामध्ये आले आहेत. यामधील जर आपण आंतरमशागतीचा विचार केला तर तण नियंत्रणाकरिता देखील अनेक छोटी अशी कृषी यंत्रे उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांना या यंत्राचा खूप मोठा फायदा होत असून काम करताना वेळेत आणि खर्चात देखील बचत होत आहे.

कृषी क्षेत्रामधील अनेक अवघड कामे आता यंत्रांच्या वापरामुळे सोपे झालेले आहेत. भारतामध्ये अनेक छोटे-मोठे स्टार्टअप असून या माध्यमातून अनेक उपयुक्त अशी यंत्रे विकसित करण्यात आलेले आहेत. यामध्ये जर आपण तणनियंत्रणाकरिता विचार केला तर हे पीक उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे काम आहे.

कारण जर पिकांमध्ये जर तणांचा प्रादुर्भाव वाढला तर पिकांशी तणे पोषक घटकांकरिता स्पर्धा करतात व त्याचा अनिष्ट परिणाम हा पिकाच्या वाढीवर होतो. त्या अनुषंगाने तण नियंत्रण करणे खूप गरजेचे असते. तसेच तणाच्या नियंत्रणाकरिता निंदणी करावी लागते व याकरिता मजुरांचा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर वाढतो. परंतु या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या दोन तरुणांनी असेच एक महत्वाचे आणि तन-नियंत्रणाकरिता उपयुक्त असे बॅटरीवर चालणारे यंत्र विकसित केले आहे.

 दोन तरुणांनी

विकसित केले महत्त्वाचे यंत्र

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या कामाचा खूप सहज आणि सोपे झाले आहे. याचा अनुषंगाने अभियांत्रिकेचे शिक्षण घेतल्यानंतर कानपूर मध्ये दोन तरुणांनी शेतकऱ्यांकरिता उपयुक्त ठरेल असे अवजारे बनवण्याचे काम सुरू केले असून त्यांनी विकल्प नावाचे स्टार्टअप सुरू केले आहे.

या विकल्प नावाच्या स्टार्टअप चे संस्थापक आनंद चतुर्वेदी यांनी ई-बायडर नावाचे बॅटरीवर चालणारे टूल तयार केले आहे. या माध्यमातून भात आणि गव्हासारख्या पिकांमधील तण काढण्यासाठी देखील या यंत्राचा सहजतेने वापर करता येणार आहे. हे मशीन बॅटरीवर चालणारे असून त्याची बॅटरी एकदा चार्ज केली तर सहा तास  आरामात चालते व या एका चार्जर मध्ये एक एकर शेतातील तण काढण्यासाठी या यंत्राचा वापर करता येऊ शकतो.

या यंत्राच्या आधीच्या माहितीसाठी हा व्हिडिओ पहा

https://www.kisantak.in/farming-techniques/video/this-tool-will-become-a-boon-for-the-farmer-it-is-successful-for-weeding-the-crop-see-video-636679-2023-08-19

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts