Krushi News: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. यामुळे देशातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतकरी राजांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी मायबाप शासन (Government) आपल्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करत असतात.
शेतकऱ्यांच्या (Farmers) कल्याणासाठी तसेच त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मायबाप शासन वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवित असते. आता ते दिवस गेले जेव्हा शेती (Farming) हे फक्त उपजीविकेचे साधन होते. आता शेतीतून भरपूर नफा मिळू शकतो आणि त्यासाठी सरकार शेतकऱ्यांना अनेक चांगल्या संधी उपलब्ध करून देत आहेत.
शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कायम नवनवीन योजना (Farmers Income) आखते आणि त्यांचा अवलंब करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार वेळोवेळी पावले उचलत असते.
तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतीत सहभागी होऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी सरकारकडून एक उत्तम योजना आणली गेली आहे. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही शेती व्यवसायात चांगले नेत्रदीपक यश सहज प्राप्त करू शकता.
मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करता यावा म्हणुन तब्बल 15 लाख रुपयांचा लाभ देण्याची एक शेतकरी हिताची योजना आखली आहे. आज आम्ही तुम्हाला या शेतकरी हिताच्या योजनेची सविस्तर माहिती देणार आहोत.
पीएम किसान एफपीओ योजना नेमकी आहे तरी काय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आर्थिक सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना (Pradhan Mantri Kisan FPO Yojana) जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला (FPO) 15 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्रितपणे एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कामे करताना कोणतीही अडचण येणार नाही आणि खरेदीही सहज करता येणार आहे. FPO ही शेतकरी आणि उत्पादकांची एक प्रकारची एकात्मिक संघटना आहे जी शेतकऱ्यांसाठी काम करते.
ही संस्था कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असते. या योजनेच्या माध्यमातून या संस्थांना सरकारकडून 15 लाख रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम 3 वर्षात दिली जाईल. या योजनेंतर्गत देशातील 10 हजार नवीन शेतकऱ्यांच्या संघटना तयार करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
FPO चा काय फायदा होईल
»या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 15 लाखाचा लाभ मिळणार असून त्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
»शेतकरी मध्यस्थांपासून मुक्त होतील आणि त्यांना त्यांच्या पिकांना चांगला दरही मिळेल.
»स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत पीएम किसान एफपीओ योजनेसाठी सरकारने 500 कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.
»शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात एफपीओ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील यात शंका नाही.
अर्जाची प्रक्रिया काय आहे
»FPO मध्ये अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी »बाजाराची अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक ठरणार आहे.
»वेबसाइटच्या होम पेजवर गेल्यानंतर FPO च्या पर्यायावर क्लिक करा.
»त्यानंतर नोंदणीचा पर्याय तिथे दिसेल. त्यावर क्लिक करावे लागणार आहे.
»यानंतर समोर उघडलेल्या नोंदणी फॉर्ममध्ये संबंधित शेतकऱ्यांना माहिती भरावी लागणार आहे.
»त्यानंतर स्कॅनिंग करून पासबुक, रद्द केलेला चेक किंवा आयडी प्रूफ अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.