कृषी

Farmer Loan : अशापद्धतीने मिळवा 2 ते 4 टक्क्यांनी 3 लाखांपर्यंत तारणमुक्त कर्ज, वाचा ए टू झेड माहिती

Farmer Loan :- बऱ्याचदा आपण पाहतो की नैसर्गिक अवकृपा आणि बाजारपेठेतील घसरलेले शेतीमालाचे दर यामुळे शेतकरी भरघोस उत्पादन घेतात परंतु हातात काहीच राहत नाही. त्यामुळे उदरनिर्वासाठी लागणारा पैसा आणि परत पुढील हंगामा करिता शेतीला लागणारा खर्च  कशा पद्धतीने करावा ही मोठी चिंता शेतकऱ्यांना भेडसावते.

जर शेतीची सगळी कामे वेळेवर करायचे असतील तर हातात पैसा असणे गरजेचे आहे. जर पैसा हातात नसेल तर शेतीची कामे वेळेवर होणार नाहीत आणि त्याचा फटका हा उत्पादनाला बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून वेळेवर कर्ज पुरवठा होणे तितकेच गरजेचे आहे.

परंतु जर आपण बँकांकडून  मिळणाऱ्या पीक कर्जाचा विचार केला तर बऱ्याचदा बँकांचा आडमुठेपणा शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळण्यामध्ये प्रमुख अडथळा बनतो. वेळेवर पिक कर्ज मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाणे शेतकऱ्यांना सावकाराकडे हात पसरावे लागतात. यामध्ये अवाच्या सव्वा व्याज आकारले जाते व शेतकरी या चक्रात एकदा गुंतला की पूर्णपणे यामध्ये गुंतून जातो.

म्हणून या दृष्टिकोनातून विचार केला तर सरकारची किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांना फायद्याची योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तारणमुक्त आणि कमीत कमी व्याजदरांमध्ये कर्जाचा पुरवठा होतो व शेतीसाठी लागणारा पैसा वेळेत मिळाल्यामुळे वेळेत शेतीची कामे पूर्ण करता येणे शेतकऱ्यांना शक्य होते.

 शेतकऱ्यांना फायदेशीर आहे किसान क्रेडिट कार्ड योजना

जर आपण किसान क्रेडिट कार्ड योजना पाहिली तर ही योजना 1998 मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली योजना होती व तेव्हा ही योजना नाबार्डच्या माध्यमातून राबविण्यात येत होती. परंतु आता सगळ्यात यशस्वी योजना म्हणून नावारूपाला आलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबरोबर किसान क्रेडिट कार्ड योजना जोडली गेली असल्यामुळे तिचे महत्त्व आता वाढलेले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी सहजपणे किसान क्रेडिट कार्ड योजनेकरिता अर्ज करू शकतात व तीन लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा मिळवू शकतात.

 किसान क्रेडिट कार्डची काही महत्त्वाचे वैशिष्ट्ये

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन टक्के ते चार टक्के इतक्या अल्प व्याजदरात कर्ज मिळणे शक्य होते व या माध्यमातून तीन लाखांपर्यंत तारणमुक्त कर्जाची सुविधा उपलब्ध होते. तसेच या माध्यमातून पिक विमा संरक्षण मिळते व घेतलेले कर्जाची परतफेड करण्यासाठी असलेल्या अटी देखील नाममात्र असतात.

 किसान क्रेडिट कार्ड योजनेकरिता कोण करू शकतो अर्ज?

जमिनीचे मालक असलेले व शेती करत असलेले सर्व शेतकरी बंधू या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून अर्ज करू शकता. महत्त्वाचे म्हणजे भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या अंतर्गत कर्ज मिळणे शक्य आहे.

वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली आणि 75 वर्षाच्या आत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना याकरिता अर्ज करता येतो. तसेच यामध्ये शेतकरीच नाही तर मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन व्यवसायाशी संबंधित असलेले कोणतीही व्यक्ती किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पात्र आहेत. मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धनाशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळते.

त्यामुळे अशा पद्धतीने ही फायदेशीर योजना असून शेतकरी बंधूंनी याचा फायदा घ्यावा.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts