कृषी

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना मिळणार चक्क 100% अनुदान ! घरबसल्या अर्ज कसा करणार ? पहा सविस्तर प्रोसेस

Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक कामाची अपडेट समोर येत आहे. खरंतर राज्यात कापूस अन सोयाबीन सारख्या तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विशेष म्हणजे या तेलबिया पिकांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयत्न देखील केले जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांकरिता वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.

अशाच एका योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप अनुदानावर उपलब्ध करून दिला जात आहे. विशेष म्हणजे हा फवारणी पंप 100% अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे.

तेलबिया पिकांच्या लागवडीला चालना मिळावी, शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे, तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देणे यासाठी एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवली जात आहे.

ही एक राज्य पुरस्कृत योजना असून ती फक्त काही लिमिटेड टाईम साठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना 2022-23 पासून सुरू झाली असून 2024-25 पर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान आता आपण या योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अनुदान अर्ज कसा करायचा? या संदर्भात अगदी थोडक्यात पण सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अर्ज कसा करावा लागणार ?

फवारणी पंपासाठी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. येथे गेल्यानंतर शेतकऱ्यांना लॉगिन घ्यावे लागणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे आधीच युजर आयडी आणि पासवर्ड असेल त्यांनी युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन घ्यायचे आहे. ज्यांच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड नसेल त्यांनी तो तयार करायचा आहे आणि मग लॉगिन करायचे आहे.

लॉग इन केल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून कृषी यांत्रिकीकरण या बाबीवर जायचे आहे. मग मुख्य घटक बाबीवर क्लिक करायचे आहे. एवढे झाले की, तपशीलवर क्लिक करून मनुष्यचलित औजारे घटक निवडायचा आहे.

मग यंत्र/औजारे व उपकरणेमध्ये पिक संरक्षण औजारेमध्ये जाऊन बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन) ही बाब निवडायची आहे. मग अर्ज जतन करायचा आहे.

अशा तऱ्हेने तुम्ही बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप यासाठी अर्ज करू शकणार आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की यासाठी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यासाठी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करायचा आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts