कृषी

भले शाब्बास मायबाप शासन ! ‘या’ योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी 104 कोटींचे अनुदान मंजूर ; 30 नोव्हेंबर आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Farmer Scheme : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. म्हणून देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित केल्या जातात.

महाराष्ट्र राज्य शासन देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या अनुदानाच्या योजना राबवत आहे. यामध्ये फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देणे हेतू भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा देखील समावेश आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्याचे प्रावधान करण्यात आले आहे.

खरं पाहता ही योजना कोरोना काळात राबवण्यात आली नव्हती. यामुळे या योजनेबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. शेतकऱ्यांना देखील ही योजना बंद पडली की काय असे वाटत होते. मात्र आता या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत फळबाग लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. कारण की या योजनेसाठी शासनाकडून 104 कोटी रुपयांची करण्यात आली असून इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले जात आहेत. 

योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022-23 या आर्थिक वर्षात राबवली जात आहे. विशेष म्हणजे यासाठी 104 कोटी 50 लाख रुपयांचे अनुदानाला मंजूरी देण्यात आली आहे. दरम्यान या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी आणि अनुदानाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच उद्यापर्यंत या योजनेसाठी शेतकरी बांधव अर्ज करू शकणार आहेत. इच्छुक शेतकरी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर सदर योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

104 कोटींचा निधीला मिळाली शासनाची मंजूरी 

4 ऑक्टोबर 2022 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022-23 मध्ये राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून एक शासन निर्णय घेण्यात आला होता.

या शासन निर्णयाच्या माध्यमातून या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि 104 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आता महाराष्ट्रातील फळबाग लागवडीसाठी अनुदानाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत उद्यापर्यंत अर्ज करता येणार आहेत.

कोणत्या फळ-पिकांसाठी मिळणार या योजनेअंतर्गत अनुदान

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू यांसारख्या एकूण 16 फळबाग पिकासाठी अनुदानाचा लाभ अनुज्ञेय होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts