Farmer Scheme : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या हे शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना शेती कशासाठी सोयीचे व्हावे अनुषंगाने केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात.
या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता आणणे हा सरकारचा उद्देश असतो. जसं की आपणास ठाऊकच आहे शेती करण्यासाठी भांडवलाची नितांत आवश्यकता असते. पैशाविना शेती करणे अशक्य आहे. अलीकडे मातीविनाश शेती शक्य झाले आहे मात्र पैसाविना शेती करता येईल असं काही तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध झालेलं नाही.
याउलट शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पैसा वहावा लागतो. एकंदरीत काय पैसा विना शेती होऊ शकत नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणामुळे कवडीमोल उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी बांधवांकडे शेती कसण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना शेती करताना पैशांची निकड भासल्यास बँकेतून कर्ज घेता यावे आणि कर्जासाठी अधिक कष्ट घेण्याची गरज पडू नये.
या अनुषंगाने शासनाकडून किसान क्रेडिट कार्ड ही एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे शासनाकडून सांगितले जात आहे. शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डवर दिलेली कर्जाची रक्कम वेळेपूर्वी परत केल्यास अनुदानाचीही तरतूद आहे. किसान क्रेडिट कार्ड मिळवणे देखील खूप सोपे आहे.
क्रेडिट कार्डचे फायदे पाहता आज आपण किसान क्रेडिट कार्ड ही योजना आहे तरी नेमकी कशी, किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे, यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, पात्रता काय असते, कुठून अर्ज घ्यायचा, अर्ज कुठे सबमिट करायचा? यांसारख्या बारीक गोष्टी जाणून घेणार आहोत.
किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी आहे तरी काय
केंद्र शासनाची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात केवळ 4 टक्के व्याजदराने 50,000 ते 3 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कर्जाचा कालावधी 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत असू शकतो. 6 महिन्यांच्या कालावधीसाठी 4% आणि 1 वर्षाच्या कालावधीसाठी 7% व्याजासह कर्जाची परतफेड करता येते.
KCC वर कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून व्याजात 2 टक्के सूट दिली जाते. त्याच वेळी, सरकार कर्जाची रक्कम वेळेवर भरल्यास 3 टक्के अतिरिक्त सूट देते. आरबीआयच्या वेबसाइटनुसार, शेतकरी कोणत्याही व्यावसायिक बँक, आरआरबी, लघु वित्त बँक आणि सहकारी बँकेला भेट देऊन किसान क्रेडिट कार्ड कर्जासाठी अर्ज करू शकतात.
KCC कर्ज कोण घेऊ शकते किंवा पात्रता नेमक्या काय असतात
किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत खाली दिलेले शेतकरी बांधव कर्जासाठी पात्र असतात.
किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
किसान क्रेडिट कार्ड योजनेत अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या कागदपत्रांची एक प्रत जोडावी लागेल.
अर्ज कसा अन कुठं करायचा