कृषी

Farmer Scheme: भले शाब्बास मोदीजी…! मोदीजी शेतकऱ्यांना देणार 36 हजार, पण करावं लागेल हे एक काम

Farmer Scheme: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे, कारण की भारताची निम्म्याहून अधिक जनसंख्या की केवळ आणि केवळ शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. अशा परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था देखील सर्वस्वी शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे.

त्यामुळे शेतीप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी राजाच्या (Farmer) कल्याणासाठी मायबाप शासन दरबारी अनेक योजना विचाराधीन असतात तर अनेक योजना कार्यान्वित केल्या गेलेल्या असतात. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकरी हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना अमलात आणल्या आहेत.

या शेतकरी हिताच्या योजनेत पीएम किसान सम्मान निधि योजनेचा देखील समावेश आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pm Kisan Yojana) योजनेअंतर्गत, 2,000 रुपयांचे तीन हप्ते म्हणजेच 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जातात.

याशिवाय, मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अजून एक कल्याणकारी योजना राबवली आहे. पीएम किसान मानधन योजना (Pm Kisan Mandhan Yojana) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकरी बांधवांना दरमहा 3000 रुपये मासिक पेन्शन देखील मिळत आहे.

म्हणजेच पीएम किसानच्या 6 हजार रुपयांसोबत शेतकऱ्यांना 36 हजार पेन्शनही मिळू शकते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जर शेतकरी बांधव पीएम किसान मध्ये खातेदार असतील तर त्यांना कोणत्याही कागदपत्राची गरज भासणार नाही. अशा शेतकरी बांधवांची नोंदणी थेट पीएम किसान मानधन योजनेतही केली जाईल. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या योजनेचे वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेऊया.

पीएम किसान मानधन योजना काय आहे

पीएम किसान मानधन योजनेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या अंतर्गत शेतकऱ्याला 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते.

खात्रीशीर पेन्शन मिळेल

या योजनेंतर्गत, नोंदणीकृत शेतकऱ्याला वयाच्या 60 वर्षांनंतर मासिक गुंतवणुकीवर 3000 रुपये किंवा वार्षिक 36,000 रुपये किमान मासिक हमी पेन्शन मिळेल. यासाठी 55 ते 200 रुपयांपर्यंत मासिक गुंतवणूक करता येते. पीएम किसान मानधनमध्ये फॅमिली पेन्शनचीही तरतूद आहे.  खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला 50 टक्के पेन्शन मिळेल. कौटुंबिक पेन्शनमध्ये केवळ जोडीदाराचा समावेश आहे.

पीएम किसान लाभार्थ्यांना कसा फायदा होईल?

पीएम किसान योजनेंतर्गत, सरकार पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाते.  जर त्याचे खातेदार पीएम किसान मानधन योजनेत सहभागी झाले तर त्यांची नोंदणी सहज होईल. तसेच, जर शेतकऱ्याने हा पर्याय निवडला, तर पेन्शन योजनेत दरमहा कपात करण्यात येणारे योगदानही या 3 हप्त्यांमध्ये मिळणाऱ्या रकमेतून कापले जाईल. म्हणजेच, यासाठी पीएम किसान खातेधारकाला खिशातून पैसे गुंतवावे लागणार नाहीत.

किती पैसे गुंतवावे लागतील

पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत, तुम्हाला दरमहा किमान 55 रुपये आणि कमाल 200 रुपये गुंतवावे लागतील.  या संदर्भात, एका वर्षात, तुम्हाला कमाल 2400 रुपये आणि किमान 660 रुपये भरावे लागतील. आणि त्यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दरमहा 3 हजार पेन्शनचा लाभ मिळू लागेल. यासोबतच 2000 चे 3 हप्ते देखील वर्षाला येत राहतील. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts