कृषी

Farmer Scheme: शेतकरी बांधवांनो 55 रुपये जमा करा,  दर महिन्याला 3,000 मिळवा; योजना समजून घ्या

Farmer Scheme : भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांच्या (Farmers) कल्याणासाठी मायबाप सरकार (Government) कायमच प्रयत्नरत असते.

विशेषता कोरोना महामारीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरीची पेटी उघडली आहे. अनेक शेतकरी हिताच्या योजना शासनामार्फत आता राबविल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. तुम्हीही अल्पभूधारक शेतकरी असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी मोठी कामाची ठरणार आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आता मायबाप शासन शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शनचा लाभ देणार आहे. शासनाने यासाठी पीएम किसान मानधन योजना (Pm Kisan Mandhan Yojana) नामक योजना देखील सुरू केली आहे.

मात्र पेन्शनचा (Farmer Pension Scheme) लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवाना थोडी गुंतवणूक करावी लागणार आहे. मोदी सरकार पीएम किसान मानधन योजनेंतर्गत दरमहा पेन्शन देत आहे, ज्याचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

अटींची पूर्तता केल्यास तुम्हालाही योजनेचा लाभ मिळण्याची खात्री आहे. यासाठी सर्वप्रथम तुमचे वय 60 वर्षे असावे, त्यानंतर तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेशी जोडलले असणे अनिवार्य राहणार आहे.

आवश्यक अटी जाणून घ्या

पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांना काही अटींचे पालन करावे लागेल. सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असणे आवश्यक आहे. लाभार्थीचे वय 60 वर्षे असणे आवश्यक आहे. जर तुम्ही रोज 2 रुपये वाचवले तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहेत.

म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वार्षिक 36,000 रुपये मिळणार आहेत. मात्र या योजनेत सामील होण्यासाठी शेतकरी बांधवांना  दरमहा 55 रुपये गुंतवावे लागतील. मित्रांनो या योजनेत जर एखादी व्यक्ती वयाच्या 40 व्या वर्षी सामील झाली, गुंतवणूक करण्यास त्या व्यक्तीने सुरवात केली तर अशा व्यक्तीला दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतील. यासाठी संबंधित व्यक्तीकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी व्यक्तीचे वय 18 वर्षे आणि 40 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

अशी नोंदणी करा

यासाठी शेतकरी बांधवांना कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. शेतकरी CSC केंद्रात पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल.

त्याच वेळी, नोंदणीसाठी, तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असेल. याशिवाय संमतीपत्र द्यावे लागेल जे शेतकरी बांधवांचे बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेतही द्यावे लागेल, जेणेकरून वेळेत पेन्शनसाठी त्याच्या बँक खात्यातून पैसे कापता येतील.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts