Farmer Scheme: भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशात अल्पभूधारक किंवा छोटे शेतकरी (Small Farmers) अधिक आहेत. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers Income) देखील मोजकेच असते अशा परिस्थितीत देशातील छोट्या तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मायबाप शासनाकडून (Government) कायमच नावीन्यपूर्ण योजना (Scheme) चालवल्या जातात.
त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकार अनेक धोरणे आणि योजना राबवत आहे. दरम्यान, अशा तमाम गरीब अल्पभूधारक शेतकर्यांना त्यांच्या वृद्धापकाळात सामाजिक तसेच आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी, प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pm Kisan Mandhan Yojana) नामक एक महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारकडून संपूर्ण देशात राबविली जात आहे.
या योजनेस शेतकरी बांधव किसान पेन्शन योजना असे देखील म्हणतात. पीएम किसान मानधन योजनेंतर्गत, शेतकर्यांना अशा वेळी आर्थिक बळ मिळेल जेव्हा त्यांच्याकडे उपजीविकेचे साधन नसेल, म्हणजेचं शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळात ही योजना त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या म्हातारपणात, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी किंवा त्यांचा किरकोळ खर्च भागवण्यासाठी दरमहा 3000 रुपये निश्चित पेन्शन दिले जाणार आहे. मात्र शेतकरी बांधवांना म्हातारपणात या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी प्रति महिना 55 ते 200 रुपये अंशतः जमा करावे लागणार आहेत.
पीएम किसान मानधन योजना
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत, शेतकर्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर 3,000 रुपये मासिक पेन्शन, म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये वृद्धापकाळ पेन्शन दिली जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाच लाभार्थी वर्गात समाविष्ट करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत विशिष्ट वयोगटातील शेतकऱ्यांना 60 वर्षांपर्यंत ठराविक रक्कम जमा करावी लागते, त्यानंतर वृद्धावस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना ही पेन्शन परत केली जाते.
नियमांनुसार, 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील शेतकर्यांना वेगवेगळ्या दरांवर अर्धवट रक्कम जमा करावी लागते, ज्यात वयानुसार 55 रुपये ते 200 रुपये प्रति महिना प्रिमियम शेतकरी बांधवांना योजनेत जमा करावे लागतात.
पीएम किसान मानधन योजनेसाठी येथे अर्ज करा