Farmer Success Story : आपल्या देशात ग्रामीण भागाकडून शहरी भागात रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थलांतराची ही समस्या दिवसेंदिवस गहन बनत चालली आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या लिमिटेड संध्या उपलब्ध असल्याने पदवी पर्यंतचे शिक्षण किंवा उच्च शिक्षण झाल्यानंतर तरुण वर्ग गावाकडे पाठ फिरवतो आणि शहरात भविष्य घडवण्यासाठी आगेकूच करतो.
मात्र आज आपण अशा एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने शहराकडील आपल्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून गावाकडे वळत शेतीमध्ये चांगली कमाई केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्याच्या मौजे तळेगाव येथील सुचित ठाकरे या पदवीधारक नवयुवकाने पुण्यातील आपले नोकरी सोडून गावाकडे रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू केला आहे.
आजच्या घडीला हा तरुण या व्यवसायातून चांगली कमाई करत आहे. खरं पाहता कळमेश्वर तालुक्यात पारंपारिक पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सोयाबीन, तूर, कापूस यासमवेतच तरकारी म्हणजेच भाजीपाला पिकांची देखील या भागात मोठ्या प्रमाणात शेती पाहायला मिळते.
मौजे तळेगाव या ठिकाणी देखील शेतीचा हाच पॅटर्न आहे. मात्र येथील शेतकरी बांधवांना भाजीपाला पिकांची लागवड करण्यासाठी रोप दूर अंतरावरून मागवावी लागत. यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च येत होता. मग काय बी ए पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या आणि पुण्यात खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या ठाकरे यांना आपल्या चार एकर शेत जमिनीत भाजीपाला रोपवाटिका सुरू करण्याची कल्पना सुचली.
या अनुषंगाने त्यांनी आपल्या खाजगी कंपनीमधील नोकरीवर तुळशी पत्र ठेवलं आणि गावाकडे आगे कूच केली. यासाठी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेतून शेडनेट हाऊसची उभारणी केली. रोपवाटिका सुरू केल्यापासून आतापर्यंत म्हणजे जवळपास एका वर्षाच्या कालावधीत सुचित यांनी मिरची, टोमॅटो, सिमला मिरची, वांगी, टरबूज, फुलकोबी, पत्ताकोबी यांसारखी भाजीपाला पिकांची आठ लाख 40 हजार रुपये तयार करून विकली आहेत.
यातून त्याला खर्च वजा जाता तीन लाख 25 हजार रुपये निव्वळ नफा राहिला आहे. विशेष म्हणजे सुजित यांनी तयार केलेली भाजीपाला रोपे कळमेश्वर, काटोल, सावनेर तालुका तसेच मध्य प्रदेशातील पांढुर्णा व सौंसर या ठिकाणी पाठवली जात आहेत. या रोपवाटिका व्यवसायातून त्यांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे शिवाय सात ते आठ महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.
सध्या सुचित कांद्याचे रोपे तयार करत आहेत. निश्चितच सुचित यांनी शेती पूरक व्यवसाय रोपवाटिकेच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधली असून इतरांसाठी प्रेरक असं काम केलं आहे.