Farmer Success Story:- बऱ्याच व्यक्तींना मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा असते व ती त्यांची आवड असते किंवा त्यांना त्याच्यामध्ये क्रेझ असते. परंतु काही गोष्टींमुळे ती गोष्ट किंवा तो व्यवसाय व्यक्तीला करण्यात अडचणी निर्माण होतात. या अडचणीमुळे बऱ्याच व्यक्तींना आवडीच्या ठिकाणी काम करता येत नाही व वेगळ्या ठिकाणी काम करावे लागते. परंतु अशा व्यक्तींची तळमळ ही त्यांना आवडत्या गोष्टीत काम करता यावे किंवा आवडत्या क्षेत्रात काम करता यावे या पद्धतीचीच असते व ही मनाची स्थिती त्यांना स्वस्त बसू देत नाही.
अशा परिस्थितीत ते पूर्ण झोकून देऊन मेहनत करतात व त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये यश मिळवतात. यासाठी संघर्ष तर करावाच लागतो. परंतु सतत कष्ट करण्याला देखील पर्याय राहत नाही. असंख्य अडचणींचा सामना करत आपल्या आवडत्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.अगदी याच पद्धतीने पुणे जिल्ह्यातील ज्ञानेश्वर बोडके यांचे उदाहरण घेतले तर यांनी देखील अनंत अडचणींचा सामना केला व आदर्श शेतीचा पॅटर्न लोकांसमोर ठेवला. या लेखांमध्ये बोडके यांची यशोगाथा आपण बघणार आहोत.
ज्ञानेश्वर बोडके यांची यशोगाथा
पुणे येथील ज्ञानेश्वर बोडके हे नाव महाराष्ट्रातील जनतेला परिचित आहेत. एकेकाळी ऑफिस बॉय म्हणून काम करणारे ज्ञानेश्वर आज कोटी रुपये कमवत आहेत. त्यांच्यावर एकवेळ अशी होती की त्यांना असलेल्या आर्थिक अडचणीमुळे शिक्षण देखील त्यांना सोडावे लागले व पैसे नसल्यामुळे अनेक प्रकारचे कामे देखील करावे लागलेत. ज्ञानेश्वर बोडके यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती.
तसेच त्यांच्याकडे जमीन देखील खूप कमी होती. प्रत्येक लहान मुलाला जशी इच्छा असते की अभ्यास करून काहीतरी मोठे व्हायचे अगदी त्याच पद्धतीने ज्ञानेश्वरांना देखील चांगला अभ्यास करून काहीतरी व्हायचे होते. परंतु घरामध्ये आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे व घरात दुसरे कमावणारे कोणीही नसल्याने त्यांना दहावीनंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले व कामाच्या शोधात ते फिरू लागले. कामाच्या शोधात असतानाच त्यांना पुण्यात एका ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने ऑफिस बॉय ची नोकरी मिळाली. या कामातून त्यांचा कुटुंबाचा खर्च भागू लागला. परंतु या कामांमध्ये ते खुश न होते. ऑफिस बॉयचे काम ते सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत करत होते.परंतु कष्टाच्या मानाने त्यांना आर्थिक फायदा किंवा आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते.
असा मिळाला आयुष्याला टर्निंग पॉईंट
जेव्हा त्यांची ऑफिस बॉयची नोकरी सुरू होती तेव्हा त्यांच्या वाचनात एका शेतकऱ्याची यशोगाथा आली. त्या शेतकऱ्याने 1000 चौरस फूट क्षेत्रामध्ये पॉलिहाऊसची शेती केलेली होती व त्या माध्यमातून तो प्रत्येक महिन्याला 12 लाख रुपये पर्यंत उत्पन्न मिळवत होता. ज्ञानेश्वर बोडके यांनी ही बातमी वाचली व तात्काळ नोकरी सोडली.
त्यानंतर पुण्यात गेले व पॉलिहाऊस शेतीवर दोन दिवस कार्यशाळा केली. परंतु या दोन दिवसांमध्ये त्यांना पॉलिहाऊस शेती बद्दल काहीही उमजले नाही. म्हणून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्यासोबत काम करून याबद्दल शिकायचे असल्याची इच्छा व्यक्त केली. याच ठिकाणहून त्यांचा शेतीचा प्रवास सुरू झाला.
त्यानंतर त्यांनी पॉलीहाऊस शेतीचे ट्रेनिंग घेतले व बँकेकडून कर्ज घेऊन 1000 स्क्वेअर फुटात पॉलिहाऊस उभारले. यामध्ये त्यांनी 1999 यावर्षी कारनेशन आणि गुलाब या फुल पिकांची लागवड करायला सुरुवात केली व लवकरच मोठ्या शहरांमध्ये ते उत्पादन पाठवू लागले. या व्यवसायाच्या माध्यमातून विशेष म्हणजे एकाच वर्षात त्यांनी बँकेचे दहा लाख रुपये कर्ज पडले. अशा पद्धतीने शेती व्यवसायामध्ये प्रगतीचा दरवाजा त्यांनी उघडला.
आज कमवतात लाखोत
सध्या ज्ञानेश्वर बोडके हे देशी केळी, संत्रा, आंबा, देशी पपई तसेच अंजीर आणि सीताफळासारखे सर्व हंगामी आणि बिगर हंगामी भाजीपाला व फळपिके यांचे उत्पादन घेतात. एवढेच नाही तर त्यांनी दूध पुरवठा करण्याचे काम देखील सुरू केले असून दूध पिशवी बंद करून ते लोकांच्या घरी घरपोच पोहोचवण्याचे काम देखील करतात हे काम ते एका एप्लीकेशनच्या माध्यमातून करतात. हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लोक त्यांना ऑर्डर देतात आणि वस्तू त्यांच्या घरी पोहोचवल्या जातात.
विशेष म्हणजे ज्ञानेश्वर बोडके यांनी अभिनव फार्मिंग क्लब नावाचा एक शेतकरी गट स्थापन केला असून सध्या तीनशे पेक्षा जास्त शेतकरी या गटाशी जोडले गेले आहेत. या गटातील प्रत्यक्ष शेतकरी वर्षाला आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.
अशाप्रकारे जर माणसांमध्ये काय करण्याची इच्छा असेल व त्याकरिता कुठलीही कष्ट घेण्याची ताकद असेल तर व्यक्ती असामान्य यश मिळवू शकतो ज्ञानेश्वर बोडके यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.