Okra Cultivation:- कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी कालावधीमध्ये भरपूर आर्थिक उत्पन्न देण्याची क्षमता भाजीपाला पिकांमध्ये असते. परंतु याकरिता बाजारपेठेमध्ये बाजार भाव व्यवस्थित मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य कालावधीत जर भाजीपाला पिकांची लागवड केली तर नक्कीच या माध्यमातून खूप चांगला आर्थिक नफा मिळणे शक्य आहे.
आपल्याला माहित आहेस की यावर्षी टोमॅटोला कधी नव्हे एवढे उच्चांकी दर मिळत असून 20 किलोचे एक क्रेट साधारणपणे 2000 ते 2500 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कोट्याधीश देखील झाल्याच्या बातम्या आपण वाचले असतील. अगदी याच पद्धतीने अद्रक ला देखील बाजारपेठेत यावर्षी 120 ते 150 रुपये प्रति किलोचा दर मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढण्यास या भाजीपाला पिकांनी मदत केली आहे.
अगदी टोमॅटो आणि अद्रक याप्रमाणे पश्चिम आणि दक्षिण भारतातील अनेक शेतकऱ्यांना इतर भाजीपाला पिकांमध्ये देखील मोठा फायदा झालेला आहे. बऱ्याच जणांना दहा ते वीस वर्षात जितके आर्थिक उत्पन्न मिळाले नसेल तेवढे या वर्षात मिळाल्याचे चित्र आहे. भेंडी या भाजीपाल्यामुळे देखील आता शेतकऱ्यांना लॉटरी लागलेली आहे.
भेंडीने केले बिहारमधील शेतकऱ्यांना मालामाल
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, बिहार राज्यातील बेगूसराय जिल्ह्यातील बिक्रमपूर येथील रामविलास सहा यांना चक्क भेंडी पिकाच्या माध्यमातून लॉटरी लागली असून त्यांना खूप चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. या एकाच महिन्यामध्ये त्यांनी भेंडी च्या मदतीने एक लाख रुपयांपेक्षा अधिकची कमाई केलेली आहे. विशेष म्हणजे भेंडी दर्जेदार असल्यामुळे हातोहात विकली देखील जात आहे. शेताच्या बांधावर येऊन व्यापारी भेंडीची खरेदी करत असल्यामुळे वाहतूक खर्च देखील त्यांचा वाचत आहे. जर आपण रामविलास साह यांची माहिती घेतली तर ते राजस्थानमध्ये मोलमजुरी चे काम करत होते.
परंतु कालांतराने ते छठ पूजेकरिता त्यांच्या राहत्या गावी आले. तेव्हा त्यांनी त्यांच्या शेताच्या शेजारी असलेल्या शेतामध्ये भेंडीचे पीक पाहिले व त्यांनी देखील भेंडी लागवड करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कमी क्षेत्रामध्ये त्यांनी भेंडी लागवड केली व चांगला नफा मिळवला. त्यानंतर हळूहळू क्षेत्र वाढवत गेले. आज ते जवळपास एक एकर शेतीमध्ये भेंडीची लागवड करतात. यावर्षी त्यांनी भेंडी पिकाच्या माध्यमातून सात महिन्यात दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
रामविलास साह यांचे भेंडी पिकाचे खर्चाची गणित
भेंडी लागवडीचे गणित मांडताना त्यांनी म्हटले की एक एकर लागवडीकरिता त्यांना तीन हजार रुपये खर्च आला प्रत्येक महिन्याला त्यांनी तीस हजार रुपयांचे उत्पन्न या माध्यमातून मिळवले. भेंडी पिकाच्या माध्यमातून एका एकर शेतीमध्ये त्यांनी प्रत्येक महिन्याला खूप चांगली कमाई केली. या एका हंगामामध्येच त्यांनी निव्वळ दहा लाख रुपयांचा नफा मिळवला. एवढेच नाही तर त्यांच्यासोबत सहा महिलांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. अशा पद्धतीने बाजारपेठेचा व्यवस्थित अभ्यास करून चांगले उत्पादन घेतले तर नक्कीच यश मिळू शकते हे रामविलास यांच्या उदाहरणावरून दिसून येते.